हिंदू कोड बिलातील तरतुदी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

*✒हिंदू कोड बिलातील तरतुदी खालीलप्रमाणे:💥*

 *_१ )वैवाहिक हक्काची भरपाई म्हणून पतीच्या संपत्तीमध्ये पत्नीचा हक्क, मिळालेल्या स्त्रीधनावर पत्नीचा हक्क,विधवा झाल्यावर संपत्तीचा वारसाहक्क._*
*_२ )स्त्रीला पतीपासून घटस्फोट मागण्याचा हक्क,नव-याने घटस्फोट दिल्यास पोटगीची तरतूद._*
*_३ )स्त्रीला दत्तक निवडण्याचा,घेण्याचा हक्क,पारंपरिक दत्तकविधान पद्धती रद्दआणि कायदेशीर तरतुदीनुसार दत्तक घेण्याची पद्धत निश्चित.आपला मुलगा दत्तक देण्याचा मातेस अधिकार देण्याची तरतूद._*

*_४)अल्पवयीन मुलाचे पालकत्व वडील हयात नसल्यास आईकडे जाण्याची तरतूद,निसर्गदत्त पालकाने धर्मत्याग केल्यास अगर संसार त्याग केल्यास त्याचे पालकत्व निसर्गदत्त पालकाकडेच राहील,ही तरतूद._*
*_५)दत्तकास संपतीचा अर्धा हिस्सा आणि आईस संपत्तीचा अर्धा हिस्सा मिळेल.संपत्तीचा अर्धा हिस्सा तिच्याच ताब्यात राहून ती उपभोग घेईल.दत्तक आपल्या मातेस संपत्तीच्या हक्कापासून वंचित करणार नाही._*
*_६ )द्विभार्या प्रतिबंध म्हणजेच एकपत्नीत्वाची तरतूद.स्त्री जीवनाला स्थैर्य._*
*_७ )वडिलांच्या मिळकतीत मुलीला हिस्सा._*
*_८ )ज्यांना पारंपरिक पद्धतीने विवाह करावयाचा आहे;त्यांना मोकळीक मात्र वर्ण,जात,पोटजात या बाहेरील व्यक्तीशी विवाह केला,तर तो कायदेशीर विवाह म्हणून मान्यता देणारी तरतूद._*
*_९ )स्त्रीला स्वत:चा वारस ठरविण्याचा अधिकार._*

_या तरतुर्दीमुळे स्त्रियांना संपत्तीमध्ये हक्क मिळाला आणि तिचे परावलंबित्व संपवण्यास मदत झाली.द्विभार्या प्रतिबंध, वारसा हक्क,दत्तक विधान हक्क, घटस्फोटाचा हक्क आदिमुळे स्त्रीला गुलाम म्हणून दुय्यम दर्जाची वागणूक मिळणार नाही; उलट स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला._

#युगप्रवर्तक #महामानव #डॉ. #बाबासाहेब #आंबेडकर
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel