Dr babasaheb Ambedkar
आमच्यात सांस्कृतिक नैतिकता नसल्यानेच आम्ही आजपर्यंत संघटित नाही आहोत. भाग-२*
Tuesday, 27 August 2019
0
*जय भीम...*🙏🙏
*आमच्यात सांस्कृतिक नैतिकता नसल्यानेच आम्ही आजपर्यंत संघटित नाही आहोत. भाग-२*
*क्रमशः*
डॉ.बाबासाहेबांनी "The Buddha and his Dhamma" या ग्रंथात बुद्धिझम ची व्याख्या "नैतिक होणे आणि तर्कशील होणे" याच्या व्यतिरिक्त बुद्धाचा धम्म काहीच नाही अशी केली आहे. एखादी गोष्ट नैतिक व तर्कशील नसेल तर ती बुद्धांची नाही हा सोपा सिद्धांत बाबासाहेबांनी बुद्धांचे साहित्य, संस्कृती,आणि तत्वज्ञान ओळखन्यासाठी सांगितला आहे.
आम्ही ज्या संस्कृतीत जन्मलो,जे साहित्य वाचता-वाचता वाढलो त्या साहित्याने फक्त आम्हाला मोठे केले पण आमच्या संस्कृतीला तिथेच ठेवले.हा सर्वात मोठा प्रश्न आहे.मानवीबुद्धी स्वातंत्र्याचे खरे मुक्तीदाते डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत कारण बुद्धानीं कुठलेही कायदे केलेले नव्हते.बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर इथे राजे महाराजांची व्यवस्था निर्माण झाली होती.आज तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर मांडू शकता हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हांला बाबासाहेबांनी संविधानामार्फत मिळवून दिलेला आहे.तो बौद्ध संस्कृतीतील आहे.आम्ही ज्या संस्कृतीत जन्मलो,जे साहित्य वाचता-वाचता वाढलो त्या साहित्याने फक्त आम्हाला मोठे केले पण आम्ही आमच्या संस्कृतीला तिथेच ठेवले.हा सर्वात मोठा गहन प्रश्न आहे.भारताचा इतिहास कधीही बौद्ध संस्कृतीला वगळून लिहिता येत नाही. हे भारतच नाही तर सर्व विश्वाने मान्य केले आहे.असे असतानाही आपण आपली संस्कृती इथे वाचवू शकत नाही आहे .
भारतातून बुद्ध हद्दपार होत असताना रिपब्लिकनवाद्यांची जबाबदारी काय???
मी रिपब्लिकनवादी शब्दाचा उच्चार करत आहे,कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशा मध्ये संविधानिक क्रांतीच्या सोबत रिपब्लिकन क्रांती केलेली आहे.या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकांच्या ओळखपत्रावर पॅनकार्ड किंवा पासपोर्ट असो यासर्वावर शाक्यांचीच राजमुद्रा असल्याचे आढळून येते असे का? तसेच देशाच्या राष्ट्रध्वजावर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ध्वजावर धम्मचक्र अंकीत केलेले आहे असे का?कारण ह्या सर्व गोष्टी आपल्या मूळ संस्कृतीतून उदयाला आलेल्या आहेत आणि ह्या संस्कृतीचा साठा जतन करण्याची जबाबदारी तुमची आमची किंवा फक्त बौद्ध म्हणून घेणाऱ्यांची नसून या भारतात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांची आहे.कारण मनुस्मृतीने त्यांना व्यवसाय स्वातंत्र्य,अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले नाही तर ते भारतीय संविधानाने त्यांना हे स्वातंत्र्य दिलेले आहे.एका बाजूला अशी संस्कृती आहे जी मानवाला गुलाम बनवू पाहत आहे आणि दुसऱ्या बाजूला अशी एक संस्कृती आहे जी मानवाला स्वातंत्र्य देऊन त्याच्या स्वातंत्र्याच्या सिमा अधिकाधिक उंचवू पाहत आहे. मग तुम्हांला कुठल्या संस्कृतीचे रक्षण करायचे आहे,याचे सुद्धा बौद्धिक स्वातंत्र्य तुम्हाला बाबासाहेबांनी 1950 नंतर संविधानातून दिलेले आहे.म्हणून आपल्याला आपली संस्कृती वाढवण्यासाठी बहुजन,मुलनिवासी वाद न सांगता आपल्या संस्कृतीच्याच मुळाशी जाऊन त्यालाच पाणी घालून वाढवाण्याची आवश्यकता आहे.पण आम्ही आपली संस्कृती वाढवण्यासाठी असमर्थ का ठरत आहोत कारण बहुजन, मुलनिवासी वादामुळे,त्यांनी निर्माण केलेल्या महापुरूषांच्या गोतावळ्यात गुरफटून आपण आपल्या मार्गावरून भरकटत आहोत म्हणून हे असे घडत आहे.ही संस्कृती टिकून ठेवणे का गरजेचे आहे कारण सिद्धार्थांनी गृहत्याग करून , राजवैभव त्यागून ही बौद्ध संस्कृती निर्माण केलेली आहे.या बौद्ध संस्कृतीचा वारसा सिद्धार्थ पुत्र राहुल व सम्राट अशोकानी आपली दोन अपत्ये धम्माला दान करून धम्माचा प्रचार करण्यासाठी सुरू ठेवला.आणि त्याच प्रमाणे 1956 ला बाबासाहेबांनी नानकचंदरत्तूला सांगितले की रत्तु "जा आणि माझ्या लोकांना सांग की,मी हा रथ इथपर्यंत आणलाय त्याला कदाचित तुम्ही पुढे नाही नेऊ शकले तरी मात्र मागे जाऊ देऊ नका तो जिथे आहे तिथेच त्याला राहू द्या." मग हा रथ नेमका कोणता होता.म्हणून गेल्या साठवर्षात पदमभूषण , पदमश्री मिळवलेल्या मानकरी ,विचारवंत व साहीत्यकांनी या रथाचे विश्लेषण मात्र आजपर्यंत करू शकलेले नाही ही मोठी शोकांतीका आहे. हा रथ कोणता होता,कशाचा होता,ह्यारथाला आम्हांला कुठे न्यायचे होते याची दिशा आम्ही 6डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणा नाबतर सोडून दिलेली आहे,म्हणून आम्ही (THE REPUBLICAN) आज तुम्हांला आव्हान करत आहोत की ही जी चळवळ आहे ती 2018 पासून पुढे न नेता 1956 पासून आपल्याला पुढे न्यायची आहे. बाबासाहेबांनी आणून सोडलेला रथ हा 6 डिसेंबर 1956 पासून तिथेच पडून आहे आणि त्याला पुढे आणण्याची जबाबदारी या देशातील रिपब्लिकनवाद्यांची आहे.कारण रिपब्लिकन वाद्यांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धर्मप्रचारप्रसाराचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे.धर्माचा प्रचार प्रसार करतानां धर्माला धंदा बनवणे आणि धर्माच्या संस्कृतीसाठी बलीदान करणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे.बुद्धीजमच्या नावाने इथे मोठ्या प्रमाणात धंदा सुरू करण्यात आलेला आहे.हा रथ आपल्या स्वाधीन करत असतानां डॉ.बाबासाहेबांनी कुण्या एक-दोघांना ही जबाबदारी दिलेली नाही .नानकचंद रत्तूला जा आणि माझ्या लोकांना सांग म्हणून सांगितले मग ही लोक नेमकी कोण आहेत?? नानकचंद रत्तू मार्फत बाबासाहेबांनी दिलेल्या संदेश आज ही त्याचे स्वरूप बदलून समाजात पसरवला जात आहे.पण बाबासाहेबांचा संदेशाचा अर्थ शोधण्यासाठी बुद्धाच्या संदेशाला जी नैतीकतेची आणि तर्कशीलतेचीच कसोटी लावावी लागते तीच कसोटी आम्ही बाबासाहेबांच्या संदेश समजून घेण्यासाठी लावणे गरजेचे आहे.तेवढी नैतीकता तुमच्या मध्ये निर्माण झाली पाहीजे.संस्कृती म्हणजे नुसते नाचगाणे करणे नव्हे..आपण आपली संस्कृती आपण विसरलो आहे .आपण आपल्या संस्कृती प्रती नैतीक राहीलो नाही .पण शत्रू आपली संस्कृती विसरला नाही. त्यांनी समरसतेच्या नावाखाली फक्त मार्ग बदलले आहेत.समरसतेच्या नावावर मार्ग बदलवून आमचेच मासे त्यांच्या गळाला लावलेले आहेत याचे कारण आपली लोक आपल्या संस्कृती च्या सांस्कृतीक नैतीकतेपासून भरकटलेली लोक आहेत.म्हणून सांस्कृतीक नैतीकता असणे किती महत्वाचे आहे हे समजण्याची आपल्याला गरज आहे .शत्रूंचे साहीत्य वाचा ते त्यांच्या संस्कृती बद्दल काय लिहीतात आणि आपल्या संस्कृती बद्दल काय लिहीतात हे जाणून घ्या.आपण आपल्या नेत्यांचे विभूती पूजक बनत चाललोय ते मात्र फक्त आणि फक्त त्यांची संस्कृती आणि धर्म यासाठी जगत आहेत.हा अतिशय गंभीर आहे. ते को
णत्याही नेतृत्वाला संस्कृती पेक्षा मोठे करत नाही म्हणून आज ते सत्तेत आहेत आपण मात्र आपल्या संस्कृती पेक्षा नेतृत्वाला(नेत्याला)मोठे करत आलोय. म्हणून आपण अपयशी आहोत .एखाद्याचे नेतृत्व स्विकारा पण संस्कृतीपेक्षा नेतृत्ववाला मोठे करू नका.ज्या दिवशी तुम्ही एखाद्या नेतृत्वाला(नेत्याला) तुमच्या संस्कृती पेक्षाही मोठे कराल,त्यादिवशी तुम्ही त्या नेत्याचे गुलाम व्हाल.आज वर्तमानत हीच परिस्थिती आपल्या समाजात तयार झालेली आहे.नेतृत्व हे कधी ना कधी संपुष्टात येते. पण संस्कृती कधीही संपुष्टात येत नसते म्हणू संस्कृती पेक्षा नेतृत्व(नेत्याला) मोठे करू नका.नेत्यांच्या जय-जयकारानेच आपल्या चळवळीचा घात झाला आहे.
बाबासाहेब आणि बुद्ध या जगात आज नाही पण त्यांनी मानवी दुःखाला वाचा फोडण्याचे काम केले,मानवी दुःख दूर करण्याचे काम केले.ते जगात कुणीही करू शकले नाही म्हणून बुद्ध आणि बाबासाहेबांशिवाय आम्ही कुणालाही महापुरूष मानू शकत नाही. महापुरूष कोणाला म्हणावे याबद्दल बाबासाहेब "रानडे ,जीना आणि गांधी" या पुस्तकात लिहीतात की,जो माणूस समाजातील घाण मुळासकट बाहेर काढण्यासाठी एखाद्या भंग्याप्रमाणे काम करतो तो महापुरूष समजावा.यावरू आपण महापुरूष कोणाला म्हणावे ते ठरवावे.
तुम्ही तुमची संस्कृती,तुमचे तत्वज्ञान,तुमचे साहीत्य कधीच वाचले नाहीत.दलीत साहित्यातून त्या साहित्यकांना मोठे केले आणि या सर्वांना मोठे करत असताना हे साहित्यिक मात्र बाबासाहेबांना विसरून गेले.आपली नैतीकता गहाण ठेवणारे लोक जर तुमच्या चळवळीचे नेतृत्व करीत असतील,तर अशा चळवळी इथे कधीच उभ्या राहणार नाही. कारण तुमच्या संस्कृतीने तुम्हांला ते शिक्षण दिलेले नाही.आमची संस्कृती इथे पहिल्यांदाच आम्हांला पंचशिल शिकवते.त्यामुळे सामाजिक जीवनात जगत आसताना तुमचे शील हे फार महत्त्वाचे असते.बाबासाहेब एका ठिकाणी असे म्हणतात,की "मी खूप विद्वान आहे म्हणून लोक मला घाबरत नाही,तर माझ्या विद्वत्तेपेक्षा मी सर्वाधिक शीलवान आहे म्हणून ते माला घाबरतात".आणि म्हणून स्री आणि पुरूष दोघांनीही नीतीवान होणे गरजेचे असते.आणि ही नैतिकतेची शिकवण आम्हांला आमची संस्कृती देते.हेच साहित्य ही संस्कृती सांगण्यासाठी बाबसाहेबांनंतर गेल्या 60वर्षात कोणीही इथे जन्माला आले नाही??आम्ही हे जे आज इथे आपल्याच नेत्यांविषयी बंड केले आहे ते या काळाची गरज आहे म्हणून आम्ही केलेले आहे. भारतीय समाज हा व्यक्ती पुजक असल्यामुळे आपण ज्या व्यक्तीला पुजत असू त्या माणसांच्या कार्याचे योग्य मुल्यमापन करून स्विकारणे हे ही तितकेच गरजेचे आहे आणि त्या उद्देशाने बाबासाहेबांनी "रिडल्स इन हिंदूझम"(हिंदू धर्माचे कोडे) हा ग्रंथ लिहीला.त्याचप्रमाणे आपण आपल्या नेत्याचे विभुती पुजक बनण्या अगोदर त्याच्या कार्याचे योग्य पद्धतीने मुल्यमापन करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे.आज जो काही आपल्या नेतृत्वाला डोक्यावर घेऊन तुम्ही त्यांचे विभुतीपुजक बनलेले आहात त्या नेत्याच्या कार्याचेही योग्य मुल्यमापन करणे गरजेचे झालेले आहे .आमची संस्कृती माणसांवरच नाहीतर जनावरांवर सुद्धा प्रेम करणारी संस्कृती आज आंबेडकर नावाखाली जर माणसं मारत असेल तर अशांची संस्कृती तपासून पाहण्याची आज गरजेचे झालेले आहे.आम्ही आमच्या संस्कृती प्रती नीतीमान नाही,तर आम्ही जगतोय कशासाठी? तुम्ही आम्ही आज इथे आहोत उद्या नसणार पण ही राऊण्डटेबल कॉन्फरन्स आम्ही बुद्धांवर बोलतोय ,आम्ही डॉ.बाबासाहेबांवर बोलतोय ,आम्ही सम्राट अशोकावर बोलतोय , आम्ही आमच्या संस्कृतीवर बोलतोय कारण आम्हीया देशात रिपब्लिकन ते तत्व पेरण्याचे काम करीत आहोत आणि हीच आमची मुळ संस्कृती आहे.
या संस्कृतींच काय?जी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला दिली.त्या संस्कृतीचे काय? जी 26 /1/1950 ला बाबासाहेबांनी आपल्याला दिली.अगोदर या संस्कृतीकडे नैतिकतेनी बघा चळवळीचे आपण नंतर बघू .प्रकाश आंबेडकर बोलता बोलता बोलून गेले की चळवळ संपलेली आहे म्हणून,चळवळ कधीही संपत नाही ती संस्कृती आहे.जीवंत माणसे मारून चळवळ जिंवत करता येत नाही आणि तसे होत असेल तर तुमच्या संस्कृतीत फरक पडला आहे असे समजावे कारण ती संस्कृती आमची नाही . दंगल,बाँम्बस्फोट,हत्या,रक्तपात करून सत्तेत येण्याची संस्कृती शत्रूंची आहे आपली नाही.रक्तविहीन क्रांती ही आपली संस्कृती आहे.जी माणसे बुद्धीने हारतात तेच माणस बळाचा वापर करतात.हे आपल्या संस्कृतीत घडत असेल तर ते आपल्यासाठी हे घातक आहे.म्हणून आपल्या संस्कृती बद्दल स्वतामध्ये आत्मीयता निर्माण झाली पाहीजे.संस्कृती प्रती नैतीक होणे म्हणून त्या संस्कृती चे वाहक म्हणून आपली जबाबदारी आहे .रिपब्लिकन ही सुद्धा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे कारण ते शाक्य काळापासून भारतात होती.ज्या वेळी आपण आपली संस्कृती सोडतो त्यावेळी विकृती निर्माण होते.आणि ती विकृती सध्या बहुजन,मुलनिवासी च्या स्वरूपात निर्माण झालेली आहे.या विकृतीने शत्रू ला बलाढ्य करण्याचे काम इथे केलेले आहे.त्याला तुम्ही पुढील 200वर्षे संपवू शकत नाही ऐवढा तो भक्कम केलेला आहे.
आपल्या संस्कृतीचा रथ प्रामाणिकपणे पुढे न्यायचा आहे. सामाजिक लोकशाही चा जाहीरनामा "The Buddha and his Dhamma" या ग्रंथामध्ये जो बाबासाहेबांनी आम्हांला दिलाय तो आपण सर्वांना स्विकारण्याची गरज आपल्याला आहे.तुम्ही जर फक्त बुद्ध आणि बाबासाहेब सांगितले तर इतर जाती आमच्याशी जुळणारच नाही असा विरोधकांचा आमच्यावर आरोप आहे.त्यांना माझे हे सांगणे आहे,की माणसं जोडण्यासाठी जातीची गरज नाही.तर दुःखाची गरज असते हीच आमची संस्कृती आहे. त्यांच्यात संविधानिक संस्कृतीप्रती नैतीकता निर्माण करण्याची गरज आहे. आपण आपली संस्कृती अशीच सोडून देत असाल तर आपण आपले अस्तित्व संपवत आहोत.म्हणूनच आपण संघटित होण्यासाठी आपल्यामध्ये *सांस्कृतिक नैतिकता* निर्माण होणे फार गरजेचे आहे.
*द रिपब्लिकन राऊंड टेबल कॉन्फरन्स,पुणे 26 मे 2018 या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते-*
*आयु.कपिल सरोदे*
*THE REPUBLICAN*
*Reg No - MH/959/2019/PUNE*
*टंकलेखन- मनिषाताई कांबळे*
*THE REPUBLICAN*
3/6/2018

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment