✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    आमच्यात सांस्कृतिक नैतिकता नसल्यानेच आम्ही संघटित नाही आहोत. भाग-१

    *जय भीम..*🙏🙏

    *आमच्यात सांस्कृतिक नैतिकता नसल्यानेच आम्ही संघटित नाही आहोत. भाग-१*

    इथल्या समाज मनामध्ये रूजवण्यासाठी जे साहीत्य निर्माण व्हायला पाहिजे होते ते साहित्य आजपर्यंत निर्माण होऊ शकले नाही.दलित साहित्य निर्माण झाले!ज्या प्रमाणे दलित साहीत्यकांनी आपल्या साहीत्यातून स्वताच्या वेदना वेशीवर मांडल्या ,स्वताचे दुःख मांडले त्यामुळे त्या साहित्यातून दलीत चळवळ निर्माण झाली.या दलित चळवळीने या देशातील मानवाला कधीही भारतीय नागरिक म्हणून ओळख दिली नाही. त्याच प्रमाणे बहुजन साहित्यिकांनी जे साहित्य निर्माण केले त्या साहित्यातून बहुजन चळवळ निर्माण झाली.
    परंतु आमचा 1950 नंतरचा जो काही मुळ संघर्ष होता तो संविधानीक भारत अर्थात (प्रजासत्ताक भारत) आणि दुसऱ्या बाजूला धर्मसत्ताक भारत असा होता.धर्मसत्ताक भारत वादयांनी त्यांचा धर्म , त्यांची संस्कृती भक्कम करण्यासाठी गेल्या 60 वर्षात जे साहित्य निर्माण केलेले आहे ते पूर्णपणे एका संस्कृती ला म्हणजेच त्यांच्या संस्कृती ला भक्कम करणारे व दुसऱ्या संस्कृतीला उध्वस्त करणार साहित्य निर्माण केले.कुठलेही साहीत्य निर्माण होत असतानां त्याला एक सांस्कृतिक संघर्षाची जोड असते. डॉ.बाबासाहेब आपल्या प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतीक्रांती या ग्रंथात असे सांगतात की, यादेशातील मूळ संघर्ष हा बौद्ध धम्म आणि ब्राम्हणधर्म यांच्यातील सांस्कृतिक सत्तासंघर्ष आहे. मग इथेच सर्व साहित्य निर्माण होण्याची गरज होती.कोणते साहित्य निर्माण व्हायला हवे होते?? इथला मूळ संघर्ष श्रमण संस्कृती आणि ब्राम्हण संस्कृती आहे .असे असतानां आम्ही निर्माण केलेल्या साहित्याचा पाया काय ?उद्देश काय ? उलट ब्राम्हण संस्कृती ही ब्राम्हणवाद्यांनी टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या धर्माशी व संस्कृतीशी प्रामाणिक राहून त्या संस्कृती ला पोषक असे साहीत्य निर्माण केले व आपली संस्कृती व धर्मसत्ता इथे मजबुत केली आहे. पण आमच्या साहित्यकांनी आमच्याच संस्कृती चा घात केला आहे.त्यामुळे आपल्याला आमची बौद्ध संस्कृती जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला आपले बौद्ध साहीत्य निर्माण करण्याची इथे गरज आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ बुद्ध ह्या फक्त दोन व्यक्ती होत्या.आंबेडकर नावाचे कुठले ही तत्त्वज्ञान नाही  किंवा बुद्ध नावाचे कुठलेही साहीत्य व तत्वज्ञान नाही.आंबेडकरवादाच्या नावावर इथल्या साहीत्यकानी जे साहीत्य निर्माण केले त्यातून एक व्यक्तीपूजक असा वर्ग निर्माण केला.जे बाबासाहेबांना कधीही मान्य नव्हतं. आंबेडकर वादाच्या नावावर एक व्यक्ती म्हणून बाबासाहेबांनां मोठे करण्यात इथले साहित्यिक यशस्वी झाले पण त्यांचे विचार मात्र मोठे करू शकलेले नाही.
    बुद्धांच्या महापरिनिर्वानाच्या शेवटच्या दिवशी बुद्धांचा सहकारी आनंदा बुद्धांना विचारतो की, भगवंता तुमच्या महापरिनिर्वाणानंतर आमचा शास्ता कोण असणार? त्यावेळी बुद्धांंनी सांगितले की माझ्या नंतर माझा "धम्मच यापुढे तुमचा शास्ता राहील".बुद्ध असे म्हणाले नाही की,माझा मुलगा राहुल आहे,माझी पत्नी अजून जिवंत आहे.त्यामुळे बुद्धांनी इथेच आपली रक्तवंशाची नाळ तोडून टाकली आहे.आणि त्यांच्या विचारांनी आणि तत्वानी जुळणारी संस्कृती आपल्याला दिलेली आहे,आणि म्हणून आपली जी संस्कृती आहे ती बुद्धांच्या विचारांशी जुळलेली संस्कृती आहे .म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांच्या विचारांशी जूळणारी संस्कृती आपल्याला दिलेली आहे. कारण बाबासाहेब असे म्हणतात की,या भारतात बौद्ध संस्कृतीचे पुनर्जीवन करणे हे माझ्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.जर बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम धेय्य जर भारतात बौद्ध संस्कृती निर्माण करणारे असेल तर आम्ही निर्माण केलेल्या आतापर्यतच्या साहीत्य आणि तत्त्वज्ञान याचा पाया आणि उद्देश काय????
    डॉ.बाबासाहेबांनी "The Buddha and his Dhamma" हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ लिहीत असताना "नैसर्गिक पाण्याचा मानवी अधिकार" हा शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये झालेल्या संघर्षातून दाखवून दिला आहे.शाक्य आणि कोलिया यांच्यातील 2500 वर्षापूर्वी नैसर्गिक पाण्यावरून जो संघर्ष चालू होता तोच संघर्ष मागील 60 ते 70 वर्षापूर्वीही चालु होता. याचाच अर्थ असा आहे की जो आपले शत्रू आहे तो आपली संस्कृती अजूनही विसरलेला नाही तो आपली संस्कृती अजूनही जतन करून आहे.आणि मानवी अधिकार देणारी आमची संस्कृती ,मानवीय स्वातंत्र्य देणारी आमची संस्कृती ,मानवीय दुःखमुक्ती करणारी आमची संस्कृती आज शोधतानां फार संकटानां सामोरे जावे लागत आहे.2500 हजार वर्षापूर्वी बुद्धांनी जे संदेश दिले होते ते लिखित स्वरुपात नव्हते .परंतु बाबासाहेबांनी स्वता लिखाण केले आहे.बाबासाहेबांनी त्यांचं साहित्य,त्यांची संस्कृती,त्यांचं तत्वज्ञान व त्या तत्त्वज्ञानाची परिभाषा आणि मानवी मुक्तीचा मार्ग आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लिहून आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे. असे असतानां आम्ही मात्र बाबासाहेबांचे साहित्य
    न वाचता इतर साहीत्य वाचून आपल्या मानवमुक्ती च्या संघर्षाच्या संस्कृती पासून फार दूरावलो गेलो आहे.
    क्रमशः .....

    *द रिपब्लिकन राऊंड टेबल कॉन्फरन्स,पुणे 26 मे 2018 या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते-*
    *आयु.कपिल सरोदे*
    *THE REPUBLICAN*
    Reg No - MH/959/2019/PUNE

    *टंकलेखन- मनिषाताई कांबळे*
    *THE REPUBLICAN*

    • 3/6/2018
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: