✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    भिमाकोरेगाव पेक्षाची मोठी क्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली

    भिमाकोरेगाव पेक्षाची मोठी क्रांती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केली 

    जय भीम नमो बुध्दाय
     काल भिमाकोरेगाव शौर्य दिवस झाला. लाखोंच्या संख्येने एक जानेवारी 1818 ला ला झालेल्या   आत्मसन्माच्या युद्धात पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना हरवले होते. त्या शौर्यची नोंद म्हणून भिमाकोरेगाव येथे स्तंभ उभारलेला आहे,त्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच 1927 साली भेट दिली होती..
    त्या शौर्याचा अभिमान म्हणून आपण सर्व भिमाकोरेगाव या ठिकाणी दरवर्षी जातो.. धार्मिक , जातीव्यवस्था, आणि जातीपातीच्या बंधनात हजरो वर्ष गुलामगिरी च्या विरोधात बंड पुकारून केलेले आत्मसन्माचे युध्द होय. त्या युध्दा नंतरही  आपली धार्मिक गुलामी नष्ट झाली का ..? तर नाही  कारण जातीच्या,धार्मिक भेदभाव जातपात यामुळें येथील महार समाजाला गावाबाहेर ठेवलेले होते.कोरेगाव युद्धा नंतर ही आपली सामाजिक परिस्थिती किती सुधारली होती. काहीही सुधारलेली नाहीच. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्य समाजासाठी इतके  संघर्ष करावा लागला नसता.
    पण तेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अफाट अभ्यास करून अस्पृश्य समाजाची सार्वजनिक उन्नती काशी होईल यावर जास्तीत जास्त अभ्यास केला. अस्पृश्य समाजाला ज्या  हिंदू धर्मात समानतेचे स्थान मिळावे म्हणून ही प्रयत्न केले पण धर्माच्या ठेकेदारांनी आणि  सर्वानानी नेहमी विरोधच दर्शवला. याची या बदल आपल्याला माहिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड 18 मध्ये विस्तारित पणे माहिती मिळेल.
    त्याच प्रमाणे अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महाड, मांग, ढोर, अश्या अनेक जमातीं चा मानवी हक्कापासून आणि त्यांना समानतेने मिळावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नेहमी झटले. त्यांनी सर्व प्रकारचा अभ्यास करून असे निष्कर्ष टाकले की  "जर आपल्याला समानता, समान दर्जा, स्वतंत्र, बंधुता, न्याय हिंदू धर्म कधीही देणार नाही.  ज्या धर्मात आम्हाला समानता नाही त्या धर्मात आम्ही राहणार नाही.म्हणून त्यांनी एकच मार्ग निवडला तो म्हणजे "धर्मांतर" डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्ही धर्मांतर करणार अशी घोषणा 1935 सालीचा केली होती.
    त्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 वर्षे अनेक धर्माचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी  मानवतावादी मानवी जीवनाचा कल्याणकारी, ना जात ना भेदभाव, ना उच्च ना निच्च, फक्त समानता बंधुता, आणि स्वतंत्र देणारा असा बौध्द धम्म निवडला.
     त्या नंतर धार्मिक संस्कृती आम्ही कशी जपावी यासाठी विशेष 22 प्रतिज्ञा ही दिल्या आहेत.!
    त्या आपण धर्मांतरीत बौध्द योग्य प्रकारे पालन करतो का..? यावरची लक्ष देणे गरजेचे आहे.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले सामाजिक काम करत असतांना अस्पृश्य लोकांची गुलामगिरी कधी नष्ट न्हावी म्हणून  खूप प्रयत्न केले. शेवटी त्यांनी निवडलेला मार्ग म्हणजेच "धर्मातर"
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 5 लाख लोकांना सोबत घेऊन 14 आक्टोबर 1956 साली नागपूर येथे बौध्द धम्म दीक्षा दिली.. इतिहासातील ही  इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली धम्मक्रांती होय.
    त्याकाळी सुध्दा 1818 ला आत्मसन्माची लढाई झाली त्यात मानवीजीवांची हत्या करून केली  क्रांती होय.
    पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्मक्रांती ही कोणतेही शस्त्र न घेता कोणतेही जीवहत्या न करता केलेली ही धम्मक्रांती नकीच भीमाकोरेगावच्या झालेल्या आत्मसमनाच्या क्रांती पेक्षा मोठीच होय...

    बुध्दभूषण गवई

    इथे ही वाचा

    कोलंबसच्या आधी १४०० वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खू अमेरिकेत पोचले होते

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: