✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    'आरे' ला 'कारे' ने उत्तर द्या:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    'आरे' ला 'कारे' ने उत्तर  द्या:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    भारतीय घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात संघर्ष खूप संघर्ष केले आहे.त्याच संघर्षातून आम्हाला स्वाभिमान प्राप्त झाला आहे. त्या काळी सुद्धा अस्पृश्य असलेल्या लोकांवर अन्याय अत्याचार होते असत. आज ही तीच परिस्थिती सर्व भारतीयांवर आलेली दिसत आहे. सध्या देशात चाललेल्या हुकूमशाही च्या विरोधात अनेक ठिकाणी आवाज उठवला जात आहे.
    सदर दोन दिवसांपूर्वी दिल्ली मधील JNU या विद्यापीठात काही अज्ञात तरुणांनी मुलीच्या वस्तीगृहावर पूर्व नियोजित पणे हल्ला केला त्यात 22  विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर  अन्यायाविरुद्ध लढतांना आपल्या  जनतेला सांगतात "आता ही भीती सोडून द्या त्याने ' अरे ' म्हटल्यास तुमची 'कारे ' म्हणण्याची तयारी झाली पाहिजे व त्याने काठीने मारल्यास तुमचीही काठी उचलण्याची तयारी पाहिजे. प्रत्येक मनुष्यास स्वसंरक्षणाचा कायदेशीर अधिकार असतो. हे मी तुम्हास बॅरिस्टर या नात्याने सांगतो. या सर्व गोष्टी तुम्हास स्वतःच करण्यास शिकले पाहिजे.कारण प्रत्येकाचे मदतनीस आम्हास पोलीस शिपाई देता येणार नाही."
      आज तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील तरुणही म्हणत आहेत की बाहेर पोलीस बंदोबस्त असूनही आमच्या वर हल्ला झाला आहे. खरच आज या बदल विचार करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळी बोलले वाक्य आजची लागू होत आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणतात." की पोलीस प्रशासन योग्य वेळी आपल्या उपयोगी येईल चं असे होणार नाही, म्हणून  तुम्ही स्वतःची संघटना मजबूत करा". समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र उभारा. काय आपण आज समता सैनिक दलाबद्दल जागृत आहोत का..?

    आज जर समता सैनिक दल सर्वत्र असते तर असे हल्ले झाले असते का...?
    यावर सर्व तरुणांनी आकलन करण्याची गरज आहे.
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगितलेल्या मार्गाने चालले तरच आपला उध्दार होणार आहे.
    योग्य वेळी आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वीकारणे गरजेचे आहे.
    अन्यथा आपल्या गुलामीसाठी पुन्हा नव्याने तयार व्हा.
    इथे हि वाचा
    कोलंबसच्या आधी १४०० वर्षांपूर्वी बौद्ध भिक्खू अमेरिकेत पोचले होते
    बुद्धभूषण गवई
    THE REPUBLICAN

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: