✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग -7


    जनतेचे आचरण सुधारावे म्हणून महापात्रो चे काम चोख व्हावे म्हणून देखरेख करणारा राजा म्हणून सम्राट अशोकच आपल्याला दिसतो. सम्राट अशोकाने धम्मचारण लोकांचे होते कि नाही यापासून ते आपल्या राज्यातील जनतेला पोटभर अन्न मिळते कि नाही इतपत नजर ठेवणारा राजा सम्राट अशोक आहे. आपल्या राज्यात बेरोजगार कोणी असू नये म्हणून नव नव्या व्यवसायांची निर्मिती करणारा सम्राट अशोक क्वचितच लोकांना माहिती आहे. सम्राट अशोकाने सामान्य जनतेला आपली संतान म्हणून स्वीकारले. जनतेचे पालकत्व स्वीकारले आहे व समस्त राजेशाही लोकांना संदेश दिला कि तुम्ही जनतेचे पालक व्हावे मालक नाही अशोका बाबत अनेक गैरसमज पसरवले गेलेत पण आपण योग्य त्याच मुद्द्यांची चर्चा केलेली चांगली असते.


    सम्राट अशोकाने व्यवस्थापकीय कौशल्य हे कमालीचे होते हे सांगण्याची गरज नाही. अशोकाने बौद्ध धम्म स्वीकारला व नुसता स्वीकारला नाही तर आपल्या जनतेला हि तो आचरण्यात आणून लोकांचे आचरण सुधरवले लोकांना कोणती हि कमतरता येवू दिली नाही अशोक या जगातील पहिला असा सम्राट आहे. ज्याने शेती मध्ये हि आर्थिक महासत्ता होता येते, हे या जगाला दाखवून दिले आहे. अशोकाची अर्थ व्यवस्था शेतीवर आधारित असून शेतीच्या मालाचे विदेशात व्यापाराच्या सहाय्याने विक्री करून नफा मिळवून देण्याचे काम हे अशोकाने केलेलं आहे.


    एकूण हा शेतकरी सम्राट लोकांना कळला नाही, असेच म्हणावे लागेल. आज हे सांगण्याची वेळ येतेय कारण तुम्हाला ते कळले नाही शेती कशी करायची कोणती पिके चांगली येवू शकतात. यासाठी नियोजन बद्ध काम करण्याची पद्धत सम्राट अशोकाने या भारताला घालून दिली आहे. शेतीची बरीच उत्पादने त्या काळात जगात विक्री साठी पाठवली जात असत अशोकाने आपल्या जनतेला उद्योजक बनवले आहे. अगदी सामान्य माणूस देखील स्वतःच्या पावलावर उभा राहत होता. इतकेच अशोकाने सामान्य जनतेची कोणती हि अडचण असली तरी तिची पूर्तता करीत असे. एखादी अधिकारी देखील चुकीचे वागणार नाही, यासाठी काळजी घेणारा राजा सम्राट अशोक म्हणूनच आपल्याला इतिहासात पहावा लागतो.

    क्रमशः..


    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: