दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग -6



मित्रानो,

हि सारी लेखांची उदाहरणे देण्या मागचा हेतू लक्षात घ्या.  लोकांनी आपल्या आपल्या आपल्या पद्धतीने लिहले  आहे. बळी राजाचे अस्तित्व एक हि सिद्ध करू शकत नाही, हे सर्वात मोठे वास्तव आहे. बळी राजाचा एकूण कथा पाहून असे वाटते कि, हे पात्र मनोरंजक आहे. विशेष म्हणजे तो न्याय प्रिय प्रजा दक्ष वैगरे वैगरे विशेषणे हि केवळ कथेत ठीक वाटतात. म्हणजे एखाद्या काल्पनिक कथा कल्पना विस्तार करीत लिहणे यापलीकडे कथेत सत्यता सापडत नाही. बळी राजा बाबत असेच पाहायला मिळते.


एकूण बळी राजाचा भूगोल शोधणे कठीण शिवाय ते लिखित आधारावर नाहीच पुराण कथा सोडल्यास इतर कोणत्या साहित्यात हि, पुरावे नाहीत. आता गम्मत अशी कि - बळीराजा नेमका कोणत्या देशाचा राजा होता? आणि त्याने संघर्ष कोणा सोबत केला? हे सापडणे कठीण होऊन बसले आहे. वरील अनेक कथेत लेखात बळी विषयी चांगले आहेत शिवाय "प्रबोधन स्पिक" या ब्लॉग मध्ये चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुळात भारतीय ऐतिहासिक राजांची नाणी असतात त्याच प्रमाणे, बळी राजाचे कोणते नाणी वैगरे सापडत नाहीत किंवा तसा उल्लेख हि नाही. शिवाय, बळी राजाचे अर्थ व्यवस्थे बाबत काहीच माहिती मिळत नाही, असे का?  झाले असेल याचा विचार करता पौराणिक पात्रांची अशीच अवस्था आहे. एकूणच सर्व पौराणिक पुराणातील पात्र अशीच अस्तित्व हीन आहेत.


आता बली बाबत पाहूया. ब्राह्मण आपल्या शत्रूचा एवढा महात्म कसे काय सांगू लागतात, यामागे काय कारण असू शकते? एकीकडे बहुजनवादी ब्राह्मण द्वेषासाठी बळीचा वापर करीत असताना ह्या कथा वाचून खरेच हे लोक किती विसंगती निर्माण करतात याची जाणीव होईल. एकूणच बळीची कथा हि पौराणिक कथा असून वेगवेगळ्या कथा आपणास पाहायला मिळतात. तुम्ही आम्ही सुज्ञ वाचकांनी, अभ्यासकांनी कशा प्रकारे स्वीकारायची ते आपणावर आहे. बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता हे ब्राह्मणांनीच लोकांमध्ये पसरवले आहे. विशेष म्हणजे आज जे लोक म्हणतात ना "ईडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो." या मागचा हेतू काय हे सांगण्याची गरज नाही.


बळी सारखा राजा ब्राह्मणांचा किती आज्ञा धारक आहे, हे पाहण्यासाठी त्याचे १०० अश्वमेध केले आहेत. एक अश्वमेध कमीत कमी एक वर्षभर चालतो. म्हणजे १०० वर्षे बळी राजा केवळ अश्वमेधच करीत होता. मला सांगा त्याने जनतेच्या हिताचे काम केलंच कधी? काय पुरावे सापडतात का? कथेत हि बळी राजा कर्तव्य दक्ष नसल्याचे उदाहरणे दिसतात. शिवाय बळी राजा च्या काळात जनता सुखी होती असे म्हणायला बळी राजाचे कोणते कार्य होते हे दिसत नाही. बळीने केवळ आणि केवळ अश्वमेध यज्ञ ते हि १०० अश्वमेध यज्ञ मित्रानो कसा केला जातो. याची माहिती घेतल्यावर कळेल तुम्हाला काय असतो ते अश्वमेध चला थोडा सारांश आपण हि पाहू.


महाभारतांत आश्वमेघिक पर्वांत धर्मराजानें केलेल्या अश्वमेघांत पुढील विधि विषयक गोष्टींचा उल्लेख येतो. चैत्री पौर्णिमेस संकल्प करून अश्व सोडणें व त्याचवेळीं दीक्षा ग्रहण करणे. माघी पौर्णिमेस अर्जुन अश्वासह परत येतो. सद, आग्नी ध्रीया, पत्‍नी शाला इत्यादि यज्ञ मंडपांतील पोट भाग तयार करणे. यज्ञांतील ‘स्फ्य’ नामक उपकरण सुवर्णाचें प्रवर्ग्य व सोभा भिषव (सोम कुटणें) यांचा उल्लेख, यूपास वस्त्र गुंडाळणें, शोभेसाठीं सुवर्णाचे (जरूरी पेक्षां) जास्त यूप पुरणें, अश्वा बरोबर इतर पशूंचे उपाकरण करणें, श्येन चिती करणें, त्यांतील इष्टका (विटा) सुवर्णाच्या असणें; मृत अश्वा जवळ राज पत्‍नीनें शयन करणें, अश्वाची वपा काढून हवन करणें, अश्व मासांचे सर्व (१६) ॠत्विजांनीं अग्नीत हवन करणें. यांतील बहुतेक गोष्टी सूत्रांतील विधीशीं जुळण्या सारख्या आहेत. सुवर्णाचा स्फ्य; सुवर्णाच्या इष्टका; अश्वमासाचें सर्व ॠत्विजांनीं हवन करणें. या गोष्टी सूत्रोक्त श्रौत धर्माविरुद्ध आहेत. वाल्मिकी रामायणांत दशरथ राजानें पुत्र प्राप्तीसाठीं अश्वमेध यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. (१.१३) त्यांतील विधी विषयक गोष्टी भारतांत उल्लेखिलेल्या प्रमाणेंच असून सुत्रोक्त श्रौत धर्माशीं जुळणार्‍या कांहीं जास्त गोष्टीचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ : सुत्या (सोमाचें हवन) तीन दिवस करणें. पहिल्या दिवशीं ज्योतिष्टोम दुसर्‍या दिवशीं उक्थ्य व तिसर्‍या दिवशी अतिरात्र या ॠतूंचे अनुष्ठान करणें, राज महिषीचें मृत अश्वासमीप शयन. राज महिषींचा सूत्रोक्त नांवानें उल्लेख इत्यादि.


थोडक्यात आपण पहिले कि - अश्वमेध यज्ञात काय केले जाते यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे बळी खरेच जनतेचा राजा होता  का यावर नजर  टाकावी म्हणून खास करुन हे सांगतॊ आहे कि बळीने १०० अश्वमेध यज्ञ केलेत व १०० वेळा आपल्या राज पत्नीला  प्रत्येक अश्वा सोबत संभोग करण्यास भाग पाडले आहे, आता मला सांगा इथे बळी चारित्र्यवान राजा शोभतो का काळजात ठेवावा म्हणून काही जण म्हणतात काय काळजात ठेवणार अश्या राजाला ज्याचे वर्तन केवळ सत्ता हासील करणे इतकेच होते. बळीचा शेवट हि विचित्र आहे. वामन त्याला पाताळात गाडतो आणि सप्त पाताळाचे राज्य देऊ करतो व स्वतः तो त्याचा द्वारपाल म्हणून राहतो यांचे एकमेका विषयीचे शस्त्रूत्व होते कि मित्रत्व होते, हे सांगण्याची गरज नाही. एकूणच बळी राजा हे काल्पनिक पात्र आहे. शिवाय हे एक मोठे षडयंत्र आहे ते सम्राट अशोकाच्या विरोधात उभे केलेलं पात्र आहे  सम्राट अशोक हा जनतेची  काळजी घेणारा एकमेव सम्राट आहे. सम्राटा विषयी जाणून घेऊया.


सम्राट अशोक एकमेव सम्राट ज्याचे आपल्या राज्यातील लहान थोरापासून सर्व जनतेवर लक्ष होते. आपल्या राज्यातील जनता कशा पद्धतीने जीवन जगते कोणते आचरण करते. कोणत्या वाईट वृत्तीचा स्वीकार तर करीत नाहीत न एवढ्या अचूक पणे जनतेचे निरक्षण करून त्यांना आचरण सुद्ध करण्यासाठी अशोकाने गावोगावी ''महापात्रो'' ची नियुक्ती केली होती जगतात एकमेव असा सम्राट आहे, एकमेव असा राजा आहे. ज्याचे लक्स्खा सामन्यातील सामान्य माणसाकडे देखील आहे आणि नुसते नियुक्ती करून थांबलेला नाही अशोक तर अशोकाने महापात्रो म्हणून ज्यांची नियुक्ती केलीय ते व्यवस्थित काम करतात किंवा नाही शिवाय आज आपण ग्राम सेवक सरपंच ह्या पदे गावी पाहतो. ती आताची नसून अशोकाने इसवी सना पुर्वीच आपल्या राज्यात निर्माण केलेली आहेत. त्या पदाला अशोकाच्या व्यवस्थापनात ''रज्जूक" असे म्हटले आहे. अशोकाचे व्यवस्थापन आजच्या घडीला असणाऱ्या देशाच्या व्यवस्थापने सारखे आहे. प्रथम राजा, त्यानंतर त्याच्या खाली त्याला सहकार्य करणारी केंद्रीय अधिकारी वर्ग, राज्य अधिकारी वर्ग, जिल्हा अधिकारी वर्ग तालुका अधिकारी वर्ग व ग्राम अधिकारी वर्ग देखील आपणाला पाहायला मिळतो . एकूण भारतीय संविधानातील सारीच पदे हि अशोकाच्या साम्राज्यात या आधीच असल्याची माहिती मिळते. यामध्ये जिल्हाधिकारी यासारख्या पदाला ''समाहर्ता'' म्हटले जायचे आणि आज हि बिहार मध्ये आज हि कलेक्टरला ''समाहर्ता" म्हणतात. शिवाय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी छोटे - मोठे मदतनीस आहेत. व हे सारे अधिकारी काम करतात कि नाही यासाठी अशोकाची असणारी गुप्तचर यंत्रणा कोण होती? हे आज हि इतिहासाला माहिती नाही परंतु अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सम्राट अशोकाने काही विशेष माणसांची यंत्रणा ठेवली होती. त्याच्या नुसार प्रत्येक ठिकाणच्या अधिकार्याची व जनतेची इतम्भूत माहिती अशोकला मिळत असे. एवढेच काय अशोकाच्या जनते मध्ये देखील कोणते वादाचे प्रकार निर्माण होत असतील तर त्याची माहिती देखील अशोकला मिळत असे. एखादी घटना घडण्या आधी तिचे निवारण करणारा राजा म्हणजे सम्राट अशोक म्हणूनच इतिहासात पाहावा लागतो.


क्रमशः..
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel