Buddha Teach
Constitution
Dr babasaheb Ambedkar
सत्यशोधक लग्न पोलिस बंदोबस्तामध्ये लागले. आणि ब्राह्मणांना दक्षिणा (जोशी वेतन) देणे पद्धत बंद झाली.
२५ डिसेंबर १८७३ ला पहिलं सत्यशोधक लग्न लागलं. त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता.
पुण्यातला पुरोहितवर्ग संतापला. त्यांनी विवाहसोहळा उधळण्याची धमकी दिली. पोलीसांच्या हे लग्न लागलं. सत्यशोधक लग्नांची चळवळ वणव्यासारखी राज्यात पसरू लागली. ओतूरच्या बाळाजी कुशाजी डुंबरे पाटील या मराठयाने आपल्या २ मुलींची लग्नं या पद्धतीनं लावली म्हणून ओतूरचे रामचंद्र सदाशिव जोशी व इतर ग्रामभटजी कोर्टात गेले. आमची दक्षिणा बुडाली, आमचा धार्मिक हक्क धोक्यात आला, कोर्टाने आम्हाला सहा रूपये भरपाई मिळवून द्यावी असा दावा करण्यात आला. [ केस नंबर ८३१/१८८४, जुन्नर कोर्ट, महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र सरकार, मुंबई, २०१३, पृ. ४१९-२० ] न्यायाधिशांनी आठ आणे भरपाई म्हणून मंजूर केले. यात जोतिरावांसोबत आणखी नऊ जणांवर हा खटला भरलेला होता. त्यात सत्यशोधक समाजाच्या बलुतेदार, अलुतेदार, दलित, आदीवासी सदस्यांचा समावेश होता.
यातला विरोधाभास म्हणजे भटजींची भाषा धर्म बुडाल्याची होती पण ते भरपाई मात्र रूपयांमध्ये मागत होते!
फुल्यांनी या निकालाला आव्हान दिले. पुण्याच्या जिल्हा न्यायालयाने लग्नाला भटजीला बोलवा अगर न बोलवा पण दक्षिणा मात्र घरपोच करा असा निकाल दिला.
त्याविरूद्ध फुले उच्च न्यायालयात गेले आणि जिंकलेही. ५ जानेवारी १८९० ला हा निकाल लागला. भटजीला लग्नाला न बोलावल्यास दक्षिणा देण्याची गरज नाही असा उच्च न्यायालयाचा निकाल होता. न्या. का. त्रिं. तेलंग आणि न्या. सर विल्यम सार्जंट यांनी हा निकाल दिलेला होता.
सत्यशोधक लग्नं आणि हा जोशी वतनाचा विषय पुढे खूप गाजला.
५३ वर्षे त्यावर वाद झडले. तो मुद्दा मुंबई विधीमंडळासमोरही आला. भटजीला लग्नाला न बोलावता दक्षिणा द्यायची असेल तर मग जे लोक आपल्या घरी आपल्या हाताने आपली दाढी करतात त्यांनी दाढीचे पैसे नाव्ह्याच्या घरी पोचवावेत अशी भुमिका सत्यशोधकांनी विधीमंडळात घेतल्यावर ३ ऑगष्ट १९२६ ला जोशी वतन कायद्याने रद्द झाले.
Madhav Khare
२५ डिसेंबर १८७३ ला पहिलं सत्यशोधक लग्न पोलिस बंदोबस्तामध्ये लागले. आणि ब्राह्मणांना दक्षिणा (जोशी वेतन) देणे पद्धत बंद झाली.
Monday, 9 March 2020
0

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment