✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ब्राम्हण्यवादा ला एकच ऊत्तर आंबेडकरवाद...!

    **ब्राम्हण्यवादा ला एकच ऊत्तर आंबेडकरवाद...!
    :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
            ब्राम्हण्यवाद मुजोर झाला आहे, संविधान बदलून मनुस्मृती लागू करण्याची त्यांच्या मुखंडांची तयारी चालली आहे...!
        गेल्या सत्तर वर्षांपासून कार्यरत असलेले भारतीय संविधान एका फटक्यात संपवता येतं नाही हे मनुवाद्यांना माहित आहे म्हणूनच तर मग मनुवादी एक एक करुन संवैधानिक संस्था खिळखिळ्या करुन मनुस्मृती प्रणित व्यवस्था लागू करु पहात आहेत...!
          ब्राम्हण,वैश्य,क्षत्रिय वगळून शुद्र,अतिशुद्र मुस्लिम,शिख,ईसाई, आदिवासी,पारसी यांचे संवैधानिक अधिकार हिसकावून घेण्याची तयारी केल्या गेली आहे...!
       एनआरसी आणि एनपिआर हे त्याचेच पहिले पाऊल आहे...!
         या ब्राम्हण्यवादी विद्वेषी विचाराला देशात कोण सडेतोड उत्तर देऊ शकतो...??
     * समाजवादी आज देशात बेदखल झाले आहेत आणि सत्तेच्या साठमारीत बदनाम झाल्यामुळे चुप आहेत.समाजवादी ब्राम्हण्यवादा ला ऊत्तर देऊ शकत नाही...!
           * मोठा गाजावाजा करून विसाव्या शतकातील विचारप्रवाह म्हणून गांधीवाद वाणवला गेला मात्र गांधीवाद आज देशात क्षिण झाला आहे सत्तेच्या अविवेकी हावरटपणा मुळे भ्रष्टाचारी म्हणून नोंद झाली आणि गांधीवादी गलितगात्र होऊन थंडगार झाले आहेत...!
           * लोहिया वादी यांचीही गत तीच आहे,ते ब्राम्हण्यवादा ला ऊत्तर देऊ शकत नाहीत...!
             * डावे,ज्यांना मार्कस् वादी, लेनिन,स्टॅलिन,माओवादी संबोधल्या गेले ज्यांनी शोषक आणि शोषितांची थिअरी मांडली ते सुद्धा देशपातळीवर बेदखल झाले आहेत ते ब्राम्हण्यवादा ला ऊत्तर देऊ शकत नाहीत हे वास्तव आहे...!



          देशात मुजोर झालेल्या ब्राम्हण्यवादा ला केवळ आणि केवळ आंबेडकरवादच सडेतोड उत्तर देऊ शकतो हे भारतीय जनमानसाने सुद्धा मान्य केले आहे...!
           ब्राम्हण्यवाद मुजोर झाल्यानंतर जेव्हा जेव्हा देशातील जनता वा नेतृत्वाला या दंगाई आरएसएसच्या कृतीला ऊत्तर देण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा जनतेने आणि नेत्यांनी सुद्धा आंबेडकरवादी धोरणच स्विकारले आहे हेही लक्षात घ्यावे...!
        ऊना येथील दलितांची अवहेलना केल्या नंतर जे घडले त्याचे निरीक्षण करा...उना मधील दलितांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धम्म अंगिकारला इथं आंबेडकरवाद हेच ऊत्तर मिळाले...!
       रोहित वेमुलाची संस्थात्मक हत्या केल्या नंतर जो परिणाम म्हणून पुढे आला तर रोहित वेमुलाची आई आणि भावाने मुंबई मधील आंबेडकर भवनात बौद्ध धम्म अंगिकारला इथं आंबेडकरवाद हेच ऊत्तर मिळाले...!
            दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात केंद्र सरकारला सावरकर सांगू द्या आपणं दिल्लीतील विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर शिकवू इथेही आंबेडकरवाद हेच ऊत्तर मिळाले...!
        सीएए कायद्याच्या विरोधात    दिल्लीतील शाहिन बाग मध्ये मुस्लिम स्त्रियांच्या हातात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आणि संविधान दिसलें इथेही आंबेडकरवाद हेच ऊत्तर मिळाले...!
        जेएनयू विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांच्या हातात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आणि संविधान दिसलें इथेही आंबेडकरवाद हेच ऊत्तर मिळाले...!
        जामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांवरील अतिरेकी हल्ल्याच्या नंतर जो प्रोटेस्ट केल्या गेला तिथेही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आणि संविधान दिसलें इथेही आंबेडकरवाद हेच ऊत्तर मिळाले आहे...!
       देशातील जनतेने सच्चा आंबेडकरवादी नेतृत्वाची कास धरून ब्राम्हण्यवादी विद्वेषी विचाराला परास्त करण्यासाठी प्रयत्नरत व्हावे तरच यश मिळेल अन्यथा पालथ्या घागरीवर पाणी घालण्या सारखे होईल...!
         चलो दिल्ली...भरो दिल्ली.
        जयभीम.
    @.. भास्कर भोजने
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: