✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    बौद्धांना भावनिक ब्लॅक मेल करणाऱ्या पासून सावध रहा..!


    बौद्धांना भावनिक ब्लॅक मेल करणाऱ्या पासून सावध रहा
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला आम्हाला बौद्ध धम्म दिला. हिंदू धर्म व जाती सोडल्या तरीही तरीही स्वतःला महार म्हणून का नोंद करवी ?
     *आम्ही बौद्ध आहोत बौद्ध !
    धर्म बौद्ध व जात माहार लिहा म्हणणून सांगणाऱ्यानी स्वाभिमान गाहण ठेवला आहे.
    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मात जाती असल्याचे कधीही सांगितले नाही,डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
    *"बौद्ध धम्मात चातुर्वर्ण्य व जाती भेद नाही "*(8 मे 1955 चे बुद्ध जयंती निम्मे भाषण खंड 18(3) पान453 )

    *डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,"आम्ही झगडलो आहे ते इज्जतिकरिता, मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्या करीता आम्ही तयारी करीत आहोत,त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची  तयारीआहे (संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण ,खंड 18(3)पण 517)

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्यातील 19 वि प्रतिज्ञा आहे की, "मनुष्य मात्रास असमान  व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा मी स्वीकार करतो'* माहार म्हणून अस्पृश्य व नीच ज्या जाती मुळे केले होते तीच जात परत का लावायची. *डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,"भाकरी पेक्षा स्वाभिमान महत्वाचा आहे."*(डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18(3)पान465)
    महार लिहिले,सांगितले नाही तर  आरक्षण नष्ट होईल आशि भीती xyz नावाची चर्मकार तथाकथित बौद्ध व्यक्ती करीत आहेत .हे सत्य आहे काय?

    लोकसंख्या वरून राजकीय आरक्षित  जागा आमदार ,खासदार इत्यादी निश्चित होतात परन्तु डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले की,राखीव जागेवर निवडून गेलेले लोक तोंड बंद करून बसतात, सयूंक्त मतदार संघा मुळे गधे लोक निवडून येत  असतील तर निवडणुकांचा व जागांचा उपयोग तरी काय ?त्याचा काही उपयोग होत नाही हे अनुभवाने आता सिद्ध झाले आहे.राखीव जागा नकोत म्हणून फेडरेशन ने ठराव केला आहे.या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो"*( डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18(3)पान 528)


        राजकीय आरक्षण नको म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले तेव्हा या जागाची आंबेडकरी जनतेने काळजी करण्याची गरज काय?
     नोकरी व शैक्षणिक आरक्षण हे जनगणनेच्या संख्येवर मुळीच अवलंबून नाही. ते बंद होऊ शकत नाही.मुळीच भीती नका.भीती घालणाऱ्याना
    धुडकावून लावा. बौद्ध आणि बौद्धच  सांगा. स्वाभिमानाने जगण्यासाठी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. हिंदू धर्म गुलामी नाकारण्याची सोडला. मेलेली जनावरे खाणारे मृत मास खाणारे म्हणून महार नाव पडले ही बाब डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य केली आहे.डॉक्टर ऑपरेशन करून शरीराचा एखादा भाग कापून टाकतात तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराचे ऑपरेशन केले यात *महार जात व हिंदू धर्म हा सडका भाग कापून  फेकून दिला तो परत लावायचा प्रश्नच येत नाही....!!!
    एक बाब लक्षात घ्यावी की,
     डॉ बाबासाहेब आंबेडकर चांभार शिक्षण परिषदेत म्हणतात,
    आपला धर्म बदलला तर निदान माहार,मांग ,चांभार ही नावे तरी आपणास चिकटणार नाहीत.आपण सर्व एक होवू व उन्नती च्या मार्गाला लागू
    (डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चांभार शिक्षण परिषदेतील भाषण दिनांक 2 जुलै 1939 डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण खंड 18(2)पान273)*

    *महेंद्र बनसोडे*
    ✍✍
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: