✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    "स्त्रीमुक्तीचा महामेरू" डॉ. आंबेडकर

    "स्त्रीमुक्तीचा महामेरू" डॉ. आंबेडकर.

    #जयंती_विशेष2020

         आयरिश देशभक्त डॅनीयल ओ' कोनल (Daniel O' Connel) यांचे प्रसिद्ध वचन डॉ. बाबासाहेबांनी भारतीय संविधानासंबंधीच्या अखेरच्या भाषणात उद्धृत केले. त्यामध्ये त्यांनी व्यक्ती, स्त्री आणि राष्ट्र हे प्रतिष्ठा, निष्कलंकता आणि स्वातंत्र याशिवाय कृतज्ञ राहू शकत नाही असे प्रतिपादन केले. स्रीयांच्या प्रति डॉ. आंबेडकरांची भूमिका या वाक्यांमधून प्रत्ययास येते.

         डॉ. आंबेडकरांनी स्त्री मुक्तीचा विचार राष्ट्रीय दृष्टिकोनातून केला. ज्या देशात 50 टक्के स्त्रिया स्वातंत्र नसतात तो देश अर्धाअधिक गुलाम असतो. त्यामुळे भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्त्री मुक्तीचा विचार प्राथम्याने केला. स्त्री शक्तीचे सृजनात्मक स्वरूप राष्ट्राच्या विकासाशी जोडण्याची व्यवस्था त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाद्वारे केली. स्त्री-पुरुष समानतेसाठी त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सामाजिक स्तरीय घटना आणि कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यकर्तृत्वातून स्त्री-मुक्तीचा इतिहास उत्तरोत्तर घडत गेला. आजच्या बदलत्या परिस्थितीत स्त्री स्वातंत्र्याची चर्चा, विज्ञान, तंत्रज्ञान, पोलीस, शिक्षण आदी क्षेत्रात स्त्रियांचा जो सहभाग आहे त्यामागे डॉ. आंबेडकरांची विचार व कर्तृत्वाची संपदा आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे आणि विचार
    -धनराज दहाट.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: