✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    "देशात जल व विद्युत धोरण व शासकीय यंत्रणा निर्माण करणारे महानायक "

    "देशात जल व विद्युत धोरण व शासकीय यंत्रणा निर्माण करणारे महानायक"

    #जयंती_विशेष2020

         जल व विद्युत विकासासंबंधीचे काम हे मूलभूत व पायाभरणी स्वरूपाचे आहे. पहिले योगदान म्हणजे प्रथमच केंद्रात जल व विद्युत नीती धोरण ठरविणे. 1935 च्या कायद्यानुसार जल व विद्युत हे विभाग प्रांत व राज्यांच्या कक्षेत असल्यामुळे केंद्र सरकारचा सहभाग अगदी अल्पसा होता. शिवाय एक केंद्रीय सल्लागार वगळता केंद्रात कोणतीही शासकीय यंत्रणा न्हवती. बाबासाहेबांनी युद्धोत्तर पुनर्रचना योजनेचा भरपूर फायदा घेऊन दोन्ही गोष्टी आमलात आणल्या. केंद्राचे जल व विद्युत धोरण निश्चित केले व त्यासाठी केंद्रात प्रशासकीय यंत्रणा उभी केली.

    (अ) 1935 च्या कायद्यांतर्गत केंद्राचे जल व विद्युत धोरण व नीती ठरविली व राज्याच्या धोरणात केंद्राचा सहभाग वाढवला. प्रामुख्याने अंतरराज्यीय नद्यांच्या विकासासाठी नद्यांच्या खोऱ्यांची योजना मांडली.

    (ब) नवीन जल व विद्युत धोरण राबविण्याची केंद्रात प्रथमच प्रशासकीय यंत्रणा उभी केली. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय जल आयोग व केंद्रीय विद्युत आयोग यांचा समावेश आहे. ह्याच सध्याच्या Central Water Commission व Central Electricity Authority होत. ह्याशिवाय पुढे जाऊन विद्युत पुरवठा विभागाची स्थापणा झाली व एका अर्थाने ह्या नवीन यंत्रनेमुळेच केंद्रात जल व विद्युत विकासासाठी दोन स्वतंत्र मंत्रालये निर्माण झाली.

    (क) विद्युत विकास आयोग 1944 ला निर्माण झाल्यानंतर विद्युत धोरण निर्माण केले. त्यामध्ये विद्युत उत्पादन व पुरवठा ह्यांचे राष्ट्रीयीकरण , विजेचे मूल्य निश्चित करणे व तांत्रिक प्रशिक्षण देणे हे प्रमुख निर्णय घेतले गेले.

    (ड) जल व विद्युत धोरण व त्यासाठी योग्य ती प्रशासकीय यंत्रणा निर्माण करून दोन मोठ्या बहुउद्देशीय जलप्रकल्पानां प्रारंभ केला. हिराकुंड व दामोदर हे ते प्रकल्प होत.

    (इ) जुलै 1944 मधे मंत्रिपद सोडण्यापुर्वी बाबासाहेबांनी योग्य अशी पुनर्वसनाची योजना बनवली.

    (फ) व तिची भारतीय घटनेमध्ये योग्य ती कायदेशीर तरतूद करण्यामध्ये मदत केली.

           ह्यावरून स्पष्ट होते कि बाबासाहेबांनी व श्रम मंत्रालयाने केंद्रामध्ये प्रथमच जल व विद्युत धोरण व शासकीय यंत्रणा निर्माण करून एका अर्थाने ह्या क्षेत्रात मूलभूत पायभारणीचे काम केले.

    Ref : 'Ambedkar's Role in Economic, Planning and Water Policy'.
    By Prof- Sukhdeo Thorat.

    संकलन: प्रकाश कदम.
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: