समग्र बाळासाहेब आंबेडकर समजूत घेतांना:- भाग 3

बाळासाहेब व भारिप बहुजन महासंघ

महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय घराण्याना आव्हान देण्यासाठी बाळासाहेबांनी अकोला जिल्ह्याची निवड केली 1990 साली विधानसभेच्या जागा लढविल्या अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या सर्वसाधारण मतदारसंघातुन बंजारा समाजाचे मखराम पवार यांना पाठींबा दिला व सर्व समाजातील कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले व बौद्ध आदिवासी बंजारा बहुजन समाजाच्या ऐक्याचा विजय होतो..
या विजयाने प्रस्थापितांना राजकीय हादरा बसला आणि भारिपच्या माध्यमातून बहुजन समाजाला एक नवा पर्याय मिळाला..
23 ऑगस्ट 1990 रोजी अकोल्या मध्ये प्रमिलाताई ओक सभागृहात बहुजन समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते..
या मेळाव्याला अनेक जाती धर्माचे कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन समाजाचे स्वतंत्र संघटन असावे या साठी अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघ ही संघटना स्थापन करण्यात आली यावेळी ही संघटना भारीपसोबत सामाजिक राजकीय वाटचाल करेल असे ठरविण्यात आले भारिप व बहुजन महासंघाच्या ऐक्याचा प्रयोग मूर्तिजापूर तालुक्यात यशस्वी झाला..
बहुजन महासंघाच्या स्थापनेनंतर भारिप बहुजन महासंघाचा महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे पहिले अधिवेशन 21 मार्च 1993 रोजी शेगाव जि. बुलडाणा या ठिकाणी मखराम पवार यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आले या अधिवेशनात बाळासाहेब उद्घाटक म्हणून उपस्थित होते..
प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले व प्रसिद्ध साहित्यिक राम नगरकर उपस्थित होते या अधिवेशनात बाळासाहेबांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती..


बाळासाहेब आंबेडकरांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन

भारतीय स्त्रीच्या नशिबी प्राचीन काळापासून शोषण दैन्य दारिद्र्य गुलामीचे अपमानाचे जीवन आले आहे स्त्रीचे कार्य फक्त चूल आणि मूल एवढेच सीमित आहे असे मनुस्मृतीच्या कायद्याने ठरविले होते..
बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून स्त्रियांच्या संदर्भात मानवतावादी दृष्टिकोन ठेवून स्त्रियांना ही पुरुषांबरोबर मान सन्मान प्रतिष्ठा मिळावी व त्यांचा राजकारणात सहभाग वाढावा म्हणून 1985 ला भारिप बहुजन महासंघात महिला आघाडीची स्थापना केली व स्त्री मुक्ती परिषदेला सुरवात केली
19 सप्टेंबर 1988 ला अकोला या ठिकाणी विदर्भ स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला विविध जाती धर्मातील 10 हजार महिला उपस्थित होत्या  या परिषदेला बाळासाहेब उद्घाटक म्हणून उपस्थित होते..

या प्रसंगी काही ठराव पास करण्यात आले

1) महिलांना कौटुंबिक मालमत्तेत समान अधिकार असावा

2) दारुड्या नवऱ्या पासून महिलांना संरक्षण देण्यात यावे..

3) पतीच्या संमतीविना घटस्फोट देण्यात यावा..

4) नवऱ्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेत पत्नीचा निम्मा अधिकार असावा..

5) मुलींना मोफत शिक्षण दिले जावे..

6) लोकसभा विधानसभा जिल्हापरिषद व पंचायत समिती मध्ये महिलांना निम्मे प्रतिनिधित्व असावे..

7) अन्याय अत्याचार व बलात्कारित स्त्रियांना संरक्षण दिले जावे..

व अश्याच प्रकारे प्रत्येक स्त्री मुक्ती परिषदेत महत्वपूर्ण ठराव मांडण्यात आले
स्त्री ही कुटुंबाचा कणा आहे स्त्रियांचे हक्क समाजव्यवस्थेने हिरावून घेतले आहेत म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांनी स्त्री मुक्तीचे घोषणपत्र तयार केले
25 डिसेंबर 1998 रोजी पुणे येथे मुक्ता साळवे स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते..

क्रमश..
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel