✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    विदर्भातील रूपिअम्मचा_शिलालेख :-महाराष्ट्र बौध्द धम्म इतिहास Ambedkar Movement

    रूपिअम्मचा_शिलालेख

    विदर्भातील बुध्द धम्माचा अभ्यास करताना आपल्याला  अश्या अनेक गोष्टी समोर येतात , त्यात खास उल्लेख करण्या सारख ठिकाणे म्हणजे "पवनी" व  "मनसर" आणि आसपासचा परिसर.
    चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या पूर्व काळातील स्तूप आजही टेकडीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते , पवनी येथील "जगन्नाथ मंदिर" जे एका स्तुपावर बनवले गेले आहे.
    विदर्भात अनेक अशी ठिकाणे आहेत जी आज देखील उत्खनाच्या प्रतिक्षेत आहेत.
    काही उत्खननात इथे #रोमची नाणी सापडली आहेत , याचाच अर्थ विदर्भात जगभरातील व्यापारी येत असत , इथे बरेच राजे महाराजे होउन गेले.
    इथे खास करून एका शिलालेखाचा मी उल्लेख करू इच्छितो,  "पवनी" इथे सापडलेला हा शिलालेख एका विदर्भावर नेमलेल्या प्रांताधिकारी "रूपिअम्माचा" आहे.
    महाशत्रप "रूपिअम्मा" हा शक वंशीय असून "कुषाणांनी" त्याला प्रांताधिकारी म्हणून विदर्भात नेमल होतं.
    "रूपिअम्माचा" छाया स्तंभलेख आज "नागपूरच्या" वस्तू संग्रहालयात बघायला मिळतो, तसं पर्यटक या शिलालेखाकडे ढुंकून पाहत नाही.
    हा शिलालेख  इ. स. पू २ शतकातील आहे  कुषाणांची काही काळ विदर्भावर सत्ता होती हे या शिलालेखा वरुन स्पष्ट होते.
    हा शिलालेख धम्म लिपीतील कोरलेला आहे (ब्राम्ही) .
    नागपूर वस्तू संग्रहालयाच्या "शिलालेख" या दालनात तो प्रदर्शित करण्यात आला असून देखरेखी अभावी तो व असे अनेक शिलालेख नष्ट होण्याचा स्थिती आहेत.
    संग्रहालय  मध्ये गेल्यास बारकाईने अभ्यास केल्यास हा शिलालेख आपल्या नजरेस पडतो.... असे अनेक अनमोल वास्तु विदर्भातील मातीत उत्खननच्या प्रतिक्षेत  आहेत.......!

    सूरज रतन जगताप
    मुक्त लेणी अभ्यासक
    घणसोली नवी मुंबई
    ९३२०२१३४१४
    २८/७/२०१८
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: