विचारात परिवर्तन झाल्या शिवाय आचारात परिवर्तन होत नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर

विचारात परिवर्तन झाल्या शिवाय आचारात परिवर्तन होत नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर

आज चळवळने भयानक रूप धारण केले आहे कारण चळवळही खोट्या व पोटभरू लोकांच्या कचाट्या सापडली आहे एकतर डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे विचार निट समजले नाही काही लोकांनी बाबासाहेब अर्धवट वाचले काही लोकांनी बाबासाहेब वाचू पण आपल्या सोई नूसार चळवळ केली व सोई नुसार बाबासाहेबांचे विचार सांगितले. डॉ.बाबासाहेबांनी पशुतुल्य जिवन जगणाऱ्या माणसांना माणसा मध्ये आणाले ते गुंडगिरी करण्यासाठी तर नव्हे ना ? हे लोक ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी गुंडगिरी का करत नाहीत. जे सत्य कथन करतात त्यावर गुंडगिरी का ?  बरेच लोक बाबासाहेब वाचत नाहीत जे सत्य लिहतात व सत्य बोलतात त्यांना धमक्या देतात. बाबासाहेबांचे विचार चाकू , सुरी , कोयता , तलवार यांनी सपवू शकत नाही विचार हे आचार  परिवर्तनाचे मुळ आहे .

म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात  " विचारात परिवर्तन झाल्या शिवाय आचारात परिवर्तन होत नाही " लोकांची विवेक बुद्धी मारून टाकली आहे. लोकांची सत्य पचविण्या मानसिकता नाही. कारण बाबासाहेब गेल्या पासून आज पर्यंत खोटे सांगून चळवळी केल्या त्या आपल्या फायद्यासाठी एकदी खोटी गोष्ट दहा वेळेस मनावर बिंबवली तर ति कितीही लोकांनी खरे सांगण्याचा प्रयत्न केला तरी ति खरी वाटत नाही. खोट्याला सत्य मानन्याची मानसीकता झाली आहे. म्हणून सत्य झाले खोटे आणि खोटे झाले मोठे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही सत्याचा विजय असतो आज उद्या होईल पण वेळ लागेल पण निश्चित सत्याचां विजय होईल

*विकास शिंदे
*The Republican
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel