कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या:- प्रकाश आंबेडकर

कामगारांमध्ये भेदभाव नको, नियमित सर्वांना प्रोत्साहन भत्ता द्या

 मनपाच्या  कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच कंत्राटी आणि स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, कामगारांमध्ये भेदभाव करण्यात येऊ नये, याबाबत शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी
 

 मुंबईसह देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई रेड झोन मध्ये आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत असले तरी मुंबई मनपाचे आपत्कालीन कर्मचारी जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहे. हे कर्मचारी आपल्याला २४ तास पाणी, विज मिळावी यासाठी कर्तव्यावर आहे. तर शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थ श्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहे.  त्यांनाही शासनाने प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करतो.
Previous article
Next article

3 Comments to

  1. आम्हाला घरात कोंडून उपाशी मारणार वाटतेय...
    आम्हाला घरात कोंडून उपाशी मारणार वाटतेय... किमान जीवनावश्यक सुविधा महापालिका प्रशासनाने पुरविल्या पाहिजे ?? रहिवासी औरंगाबाद.
    महापालिकेनेही किमान आम्हाला पाण्याचा तरी पुरवठा करावा ही अपेक्षा..
    बहुतांश कुटुंबातील किराणा संपलेला आहे. तो उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाही.. तसेच बीपी शुगर अस्थमा चे रुग्ण आहेत.. त्यांच्या औषधी चा हि पुरवठा होत नाही. नागरिकांना कोणतीही मदत मिळत नाही. औरंगाबाद.
    महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी नियमितपणे येत.. नाही.. निर्जंतुकीकरण होत नाही.
    नागरिकांच्या या समस्या.. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वीस दिवसापासून नागरिकांना आतापर्यंत सरकारकडून काही मिळाले नाही.

    ReplyDelete
  2. भाषण नाही राशन दो ?

    ReplyDelete
  3. जनतेने ठरवले तर काहीही होऊ शकते..?

    ReplyDelete

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel