जगात चार प्रकारची माणसे आढळतात; ‘सर्वोत्तम’ पुरुष कसा ओळखावा?:- गौतम बुध्द
जगात चार प्रकारची माणसे आढळतात; ‘सर्वोत्तम’ पुरुष कसा ओळखावा?
एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खुना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूना उद्देशून भगवान म्हणाले, ‘जगात चार प्रकारची माणसे आढळतात.’
*पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वत:च्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुस-या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुस-याच्या हितासाठी झटतो. तिस-या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या हितासाठी झटतो पण दुस-याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वत:च्या त्याप्रमाणेच दुस-यांच्या हितासाठी झटत असतो.
जो स्वत:च्या अथवा दुस-याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजुला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वत:लाही निरुपयोगी आहे.
*‘जो स्वत:च्या कल्याणाचा त्याग करून दुस-याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिस-या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. ‘आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.’*
संदर्भ: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
लेखक: डॉ . बाबासाहेब आंबेडकर

Leave Comments
Post a Comment