"बौद्ध समाजातील एकाचवेळी तीन व्यक्ती LLB परीक्षा पास होऊन झालेत वकील मालेगावकरांसाठी गौरवात्सव बाब **संपादक:- सचिन गरूड (SSG)






**बौद्ध समाजातील एकाचवेळी तीन व्यक्ती LLB परीक्षा पास होऊन झालेत वकील** **संपादक:- सचिन गरूड (SSG)**
बघा संपूर्ण बातमी "नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ही वार्ता LLB कॉलेज निकाल जाहीर झाला
हर्ष करणारी बाब अशी की खूप संघर्ष करून या तीन व्यक्तींनी ही परीक्षा पास करून दाखवले
फुले शाहू आंबेडकरी विचारांची ही लोक यांनी आपल्या बुद्धी च्या जोरावर अनेक हलाकीचे प्रसंग सोसून गरिबीतून वर येऊन वकिली परीक्षा पास होऊन दाखवले
जाणून घ्या त्यांची नाव:-
१)निसर्गा विकास निकम, पंचशील नगर,मालेगाव
२)स्वाती हितेश गांगुर्डे, मालेगाव
३)गौतम प्रभाकर अहिरे,मालेगाव


यावेळी त्यांचा आदर सत्कार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर 331/1 येथून नितीन भाऊ झाल्टे व आंबेडकर नगर मधील जेष्ठ तरुण,महिला वर्ग यांच्या वतीने विद्यमान वकील,ऍड.निसर्गा निकम,ऍड.गौतम अहिरे,ऍड.स्वाती गांगुर्डे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आंबेडकर नगर वासीयांना त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करून आपले मनोगत ही व्यक्त केले,
बाबासाहेबांना प्रेरित असे कृत्य करून दाखवले बाबासाहेबांनी सांगितले होते शिकाल तर टीकाल
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पाऊल ठेवून हे तिन्ही व्यक्तिमत्त्व व्यक्ती ने मालेगाव शहराचे तसेच बौद्ध,आंबेडकरी जनतेचे नाव उंचावले आहेत समाजात अशीच प्रगती होवो हीच सर्व धम्म बांधवांची अपेक्षा राहील...!
जय भिम जय भारत जय संविधान
 

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel