✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    तथागतांच्या मतातला संघ.....!

     🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


    *** *तथागतांच्या मतातला संघ.....!* ***


    ✍🏻संदिप आशा भिमराव...


    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


          जयभी मिञहो,आजकाल बुद्ध धम्मातील भिक्खुसंघाबद्दल काहींच्या मते सकारात्मक तर काहींच्या मते नकारात्मक भाव निर्माण झालेले दिसुन येतात.त्यात नकारात्मक भाव निर्माण होणेदेखील साहजिकच आहे.माञ हा नकारात्मक भाव उपासकांनी सर्वच भन्तेंबद्दल ठेऊ नये.कारण 100% पैकी 70% भन्ते हे बुद्ध बाबासाहेबांच्या स्वप्नातील भन्ते नसतील माञ उरलेल्या 30% भन्तेंबद्दल वाईट भावना ठेऊ नये असे मला वाटते.

          माझ्या मते भन्तेंनी केवळ विहारावरच ताबा न ठेवता गावोगावी प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन धम्मप्रचाराचे कार्य करायला हवे.संपुर्ण मानवजातीत आपला आदर्श निर्माण करण्याचा व ते आचरणात आणण्याचा प्रयत्न भन्तेंनी करायला हवा.कारण नुसता आदर्श समोर असुन चालणार नाही तर ते प्रत्यक्षात आचरणात कसे आणता येतील याबद्दल मनन भन्तेगणाने करायला हवं.


         बुद्धांनीदेखील संघाची निर्मिती ही *आदर्श जीवन पद्धती लोकांसमोर निर्माण करण्यासाठी तसेच लोकांना त्यानुसार आचरण करण्यासाठी* केली होती.

           आज काही आदरणीय भन्ते अपवाद वगळता अनेक भन्ते हे धम्मप्रसार करण्यासाठी अपुर्ण पडत आहेत,भिक्खुसंघ इतरांसमोर आदर्श निर्माण करण्यात अपयशी ठरत आहेत  ही भारतातील बौद्ध धम्मातील संघाबद्दल सत्य परिस्थिती आहे.तथागत बुद्धांच्या मते, भन्तेंनी एकमेकांच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात,एकमेकांना समजुन मिञता बनविण्यात तथागतांनी उपदेश केला आहे.तथागत बुद्धांच्या मते,समोरचा व्यक्ती कीतीही क्रोधीत असो भन्तेंनी माञ शांत पद्धतीने त्या व्यक्तीशी सुसंवाद करायला हवा.

           तथागतांच्या मते,ज्या लोकांना धम्माचरणाचा अनुभव आपल्यापेक्षा अधिक आहे अशा लोकांचा सन्मान भन्ते लोकांनी करायला हवा आणि तो करीत असताना लहान-मोठा,उच्चशिक्षीत-अल्पशिक्षीत असा कुठलाही भेदभाव करु नये.जर समोरचा व्यक्ती चांगल्या प्रकारे बुद्ध जाणत असेल तर त्या व्यक्तीचा मान भन्तेंनी ठेवायला हवा कारण त्या व्यक्तींचा सन्मान नाही केला तर भन्तेगणाला काहीच साध्य करता येऊ शकत नाही.जर उपासकाला धम्मज्ञान असेल तर त्यांचा आदर करायला हवा,भन्तेंना धम्मज्ञून असेल तर त्या भन्तेंचाही सन्मान करावा आणि जर भन्तेला धम्मज्ञान नसेल तर त्या भन्तेचा आदरही करायला नको.

          तथागत बुद्ध संघाबद्दल म्हणतात की,वाटुन खा.जर आपल्याकडे एखादि गोष्ट जास्त प्रमाणत असेल व दुसर्या एखाद्याकडे ती नसेल तर आपण ती गोष्ट सदर व्यक्तीत समान वाटुन घेतली पाहीजे.एखादा गरीब भन्ते भुखेने मरत असेल तर आपण धनी भन्ते म्हणुन कुणीही जगु नये.एखाद्याकडे इतकं असेल की तो तेवढं खाऊही नही शकत तर दुसरा माञ भूकेने व्याकुळ होत असेल तर पहील्याने दुसर्याला आपल्यातील वाटा समान करुन द्यावा.जर एखाद्या कूटुंबातील कर्ता व्यक्ती आकास्मित मृत्यु झाला तर त्या परिवाराला भन्तेंनी मदत करायला हवी.जर एखादा मुलगा कींवा मुलगी अनाथ असेल तर तर भन्तेंनी त्यांची स्वतःहुन देखभाल करायला हवी.अशा प्रकारच्या करुणेची भावना भन्तेंनी ठेवायला हवी.धम्माबद्दल आपल्याकडे जेवढी माहीती असेल तेवढी इतरांसमोर मांडण्याचे कर्तव्य भन्तेंनी करायला हवे.

          वरील पोस्टमधुन मी केवळ एवढंच सांगु इच्छीतो की,आजच्या उपासकाप्रमाणेच भिक्खुसंघावर धम्मप्रसारणाची,धम्माचरणाची खुप मोठी जबाबदारी आहे.त्यामुळे गंभीरतेने बुद्धांना अनुसरण्याची,धम्माला अनुसरण्याची,संघाला अनुसरण्याची प्रतिज्ञा प्रत्येकाने करायला हवी.प्रत्येकाने बुद्ध धम्माचे आचरण योग्य पद्धतीने करुन नवीन अशा बुद्धाच्या काळातील संघ भारतभर निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा.

    साधु साधु साधु.....!

    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


    नमो बुद्धाय...!


    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: