✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    आजचा बौद्ध तरुण शिक्षा, रोजगार यामध्ये कुठे?

     

    "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे  आणि जो हे पाषाण करेल तो गुरागुराल्या वाचून राहणार नाही".

    आम्ही बौद्धांनी बाबासाहेबांच्या या एका वाक्यावर प्रचंड विश्वास ठेऊन आम्ही जिथं असू तिथं आपल्या मुलांना शिकवायला सुरावात केली.

     शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे आम्हाला समजलं आणि  गरीबातील गरीब सुद्धा  आपल्या मुलांना शिकवण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन जगू लागला.


                   बौद्ध समाज शिकू लागला आणि बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार मोक्याच्या जागा काबीज करायला करू लागला.

     जातीय मानसिकतेने ग्रस्त असलेल्या राजकीय लोकांना हे परिवर्तन, बौद्ध  समाजाचे अग्रेसर होणे या सर्वांमुळे त्याच्या पोटात दुखू लागलं,

     सरकारी  शाळांचा स्तर जाणून-बुजून खालावण्यात आला आणि सरकारी शाळेच्या विरोधात खाजगी शाळा उभारण्यात आल्या,शिक्षणाचे बाजारीकरण होऊ लागलं.

    जो आमचा समाज शिक्षणाकडे वळू लागला होता, पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकवत होता त्यांनी आताहीआपली हिंमत सोडली नाही या खाजगीकरनात सुद्धा बौध्द समाज आपाल्या मुलांना प्रायव्हेट शाळेमध्ये  शिकवण्यास पाठवू लागला. 


    तो पर्यंत एक पिढी तयार झाली होती जी शिकून-सवरून समृद्ध झाली होती या पिढीवर आमच्या समाजाचा खूप विश्वास होता कारण की जे लोक गरिबी आणि भेदभाव याचां चटका सहन करून समोर गेले,  आज समृद्ध झाले ते उद्या आपल्या भावंडांना मदत करतीलच अशी भाबडी आशा समाज धरून बसला होता.

     परंतु ते आमचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, शिकले-सवरल्या लोकांनी  वर गेल्यावर समाजातील खालच्या लोकांना हात दिला नाह, त्यांचा साथ सोडून समोर निघून गेले ( खूप कमी लोकांनी समाजाला साथ दिला).

    या शैक्षणिक बाजारीकरनातून  आम्ही स्वतःला सावरत नाही तर जागतिकीकरणाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या  संपविण्याचा डाव  रचला गेला आणि हळूहळू सरकारी क्षेत्र खाजगीत आणण्याचे काम सुरू झाले.

    आज आम्ही या उंबरठ्यावर येउन ठेपलो आहे की शिक्षा क्षेत्राचे पूर्ण खाजगीकरण आणि सरकारी क्षेत्राचे बऱ्याच प्रमाणात खाजगीकरण करण्यात आलेले आहे.

    आम्ही आमच्या मुलांना शिकवलं परंतु आज रोजगाराच्या कोणत्या संधी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत? रोजगाराच्या संधी बेमालूम आमच्याकडून हिसकावण्यात  आल्या आहेत.

    आजच्या तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

    खाजगी नोकऱ्यांमध्ये जो पगार आहे त्या पगारावर त्यांचा खर्च भागत नाही. स्वतःचा व्यवसाय करण्याकरता त्यांच्याकडे भांडवल नाही बँकेकडून कर्ज घेतो म्हटलं, 

    तर कोणते बँक तुम्हाला कर्ज देणार? कशाच्या भरोशावर तुम्हाला कर्ज देणार?, मग बौद्ध तरुणांनी काय करावं?

    बेरोजगारी आणि शिक्षण हे समाजातील दोन मुख्य मुद्दे आहेत आणि कोणतीही राजकीय पार्टी यावर आम्हाला तोडगा देत नाही.


    राजकारनामध्ये आमचे काय हाल आहे हे आम्हा सर्वांना माहीत आहे.

               हे हाल आम्ही आता असेच ठेवणार काय?

    शैक्षणिक,आर्थिक....  तिसर आणि महत्त्वाच राजकीय क्षेत्र

    या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आमची पीछेहाट सुरूच आहे.

    बाबासाहेबांनी रिपब्लिकन विचारधारे च्या स्वरूपात "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया" दिली.

    रिपब्लिकन पार्टीतील  गटबाजीचा फायदा घेऊन आणि

    सोबतीला बौद्ध समाजातीलच व्यक्ती घेऊन काशीराम ने प्रतिक्रांतिवादी बहुजन विचारधारा रुजविण्याास सुरुवात केली.

    आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मूलनिवासी ही नवीन प्रतिक्रांतिवादी विचारधारा सुरू करण्यात आली आहे.


    आता वेळ आलेली आहे की बौद्ध समाजाने गटाला बाजूला सारून बाबासाहेबांनी दिलेल्या रिपब्लिकन पार्टीला मजबूत करून आपले शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील स्थान पक्के करावे.

    आम्हाला शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हायचं असेल तर राजकीय क्षेत्राला डावलून हे शक्य होणार नाही .

    काशीराम ने दाखवलेलं बहुजनच गाजर बौद्धांना शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये 

    सावरू शकल नाही.


    आताही वेळ गेलेली नाही महाराष्ट्रातील संपूर्ण बौद्धांनी एकसंघ रीपब्लिकन पक्षाला मजबूत करून आपला शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय  प्रवास पुढे न्यावा. नाही तर येणारी पिढी आम्हाला कधीही माफ करणार नाही.

    जय भीम 

    सचिन गजभिये..



    अश्या  प्रकारे आपणही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर लिखाण करत असाल, तर ते लेख या वेबसाईटवर टाकायचे असल्यास  whattsapp 9930791372 यावर संपर्क करु शकता)

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: