✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    "परख्म यक्ष" नसून ती मूर्ती तथागत गौतम बुद्ध यांचे समकालीन असलेले "अजातशत्रू" यांची....!

    "परख्म" हे उत्तरप्रदेशातील एक छोटसं गाव, हे गाव प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे इथे सापडलेली मूर्ती . ईथे सापडलेली मूर्ती ही जवळपास नव फूट उंचीची असून थोडीशी स्थूल व्यक्तीची आहे स्थूल शरीरयष्टी असल्याने या मूर्तीला सरळ "यक्ष" या सज्ञे खाली खपवण्यात आली इ स पुर्व ५५५ किंवा नंतरच्या शतकात तयार करण्यात आली असणार असा तज्ञांचा कयास आहे काही विद्वानांच्या मते ही मूर्ती  इ स पुर्व तिसर्‍या शतकातील आहे , तथागत गौतम बुद्ध यांच्या समकालीन असलेले "अजातशत्रू" यांची ही मूर्ती आहे.

    मूर्तीवर मौर्य कालीन लिपीत अजातशत्रू यांचे नाव कोरण्यात आले आहे. 



    मूर्तीचा पेहेराव आणि अंगावरील आभूषणे पाहीले तर आपल्या सहज लक्षात येईल की ही कोणितरी राज घराण्यातील व्यक्ती आहे त्या काळातील वापरण्यात येणार राज अलंकार या व्यक्तीने परिधान केलेले आहे.


    अजातशत्रू यांची मूर्ती आज मथुरा वस्तू संग्रहालयात असून तिला "परख्म यक्ष" या नावाने ओळखले जाते, स्थूल शरीरयष्टी असल्याने "यक्ष" आणि "परख्म" या जागी सापडली म्हणून "परख्म यक्ष"


    अजातशत्रू यांच्या मूर्तीला जसे यक्ष म्हणून संबोधले जाते तसेच त्यांचे नातू "अजऊदयी" यांच्या मूर्तीला जी पटना जवळ सापडली जी आज कलकत्ता वस्तू संग्रहालयात आहे. तीच गत "नंदीवर्धन" यांच्या मूर्तीची नंदीवर्धन हे "अजऊदयी" यांचे सुपुत्र यांची मूर्ती देखील कलकत्ता वस्तू संग्रहालयात आहे या सर्व मूर्त्यांना पुरातत्व खाते जाणीवपूर्वक "यक्ष" म्हणते , एक वेळ झोपलेल्या जागे करता येते पण झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही तसेच काहीसे पुरातत्व खात्याचे आहे ,  आपण मात्र वस्तू संग्रहालयातील वस्तू मूर्त्या डोळसपणे पाहणे गरजेचे आहे खरा इतिहास समजून घेण्याची गरज आहे .....!


    संदर्भ : भारतीय कलेचा इतिहास , डॉ अनिल कठारे.

     सूरज रतन जगताप

    मुक्त लेणी अभ्यासक 

    घणसोली, नवी मुंबई 

    ३/११/२०२०

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: