✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेणारे देव संज्ञा मानतात तेव्हा....

     *जेव्हा बाबासाहेबांचं नाव घेणारे देव संज्ञा मानतात तेव्हा....


    * 


           जयभीम मिञहो, 14 ऑक्टोंबर 1956 रोजी आपल्या बापाने स्वपत्नीसह आपल्याला बौद्ध धम्माची दिक्षा दिली व त्याप्रमाणे आचरण व्हावे यासाठी 22 प्रतिज्ञाही दिल्यात.बाबासाहेबांनी ज्यावेळी दिक्षा घेतली त्यावेळचे लोक अशिक्षित असुनही बाबासाहेबांवर आणि बाबासाहेबांच्या कार्यावर खुप मोठी श्रद्धा ठेवणारे होते.ज्यावेळी बाबासाहेबांनी दिक्षा घेऊन लोकांकडुन 22 प्रतिज्ञा लोकांकडुन वदवुन घेतल्या त्या दिवसापासुन लोकांनी शिक्षितपणाचा अभाव असुनही घरातील सर्वच दगड धोंडे,देव्हारे नदीनाल्यात फेकुन बौद्ध धम्माचे आचरण करण्याच प्रयत्न केला. व सुशिक्षीतपणा जोपासला....


         परंतु आजचे स्वतःला उच्चशिक्षित म्हणणारे बाबासाहेबांप्रति,बाबासाहेबांच्या विचारांप्रति खरोखर आदर ठेवतो का ?? काही अपवाद वगळता स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवुन घेणारेही आज बाबासाहेबांचे विचार पायदळी तुडवित आहेत.या पायदळी तुडविणार्या लोकांमधुन स्वतःला धम्माचारी,श्रामनेर,बुद्धानुयायी भिमानुयायी म्हणणारेदेखील सुटलेले नाहीत अशांना काय म्हणावं ??


           आजही बघितलं तर आजचे धम्माचारी असो वा श्रामणेर (काही अपवाद वगळता) *देव* या संज्ञेचा पाठपुरवठा करताने दिसतात,मग ती भावना ओरीजनल असो व डुप्लिकेट(काल्पनिक) पण देव या संज्ञेपासुन हे लोकदेखील अजुन पुर्णपणे मुक्त झालेले नाहीत.काही लोकांवर तर आपला विश्वासही बसत नाही की हे लोक देव संज्ञेवरुन भावना स्पष्ट करत असतील,पर जेव्हा प्रत्यक्ष या लोकांची कृती बघितली तर खरोखर मनाला खुप मोठा धक्का बसतो की खरंच आज लोक बुद्बबाबासाहेबांना मानतात पण जाणत नाहीत.


           *काही लोक बाबासाहेबांना मानतात पण जाणत नाहीत* या वाक्याचा अर्थही स्पष्टच आहे.कारण मी आजही बघतोय असे धम्माचारी जे इतर ठीकाणी धम्माचे कार्य करतात व दुसरीकडे नवस वगैरे करताना दिसुन येतात.अशा धम्मचार्यांना मी केवळ समोर बघत नसुन त्यांना जाबही विचारलेला आहे.कारण जो बाबासाहेबांचे विचार स्विकारु शकत नाही त्याला आमची जबरदस्ती मुळीच नाही पण माञ त्याने त्या विचारांचा अपमान होईल असे वागायला नको.आज कीत्येक श्रामणेर आहेत जे देव या संज्ञेत गुरफटलेले आहेत. अहो...! ज्या बाबासाहेबांनी आपल्याला *देव* नावाच्या सडलेल्या घाणीतुन बाहेर काढले,त्यासाठी आपल्याला 22 प्रतिज्ञांचे औषध देऊन नवीन जन्म दिला,आज त्याच बाबासाहेबांच्या विचारांविरुद्ध असलेल्या *देव* संज्ञेत आपण गुरफटलेले बघुन खरंच लज्जास्पद गोष्ट नव्हे काय ?


           इतरांना बुद्ध सांगायचे,बाबासाहेब सांगायचे अन् दुसरीकडे *देव* संज्ञा भावना म्हणुन जपायची यांत कसेकाय तुम्हाला बुद्धीस्ट म्हणावे हाच मला प्रश्न पडतो आणि हो तो प्रश्न पडनेही साहजिकच आहे.


           मला या गोष्टीची माञ खरोखर खंत वाटते,आज 60 वर्षे होऊनही बाबासाहेबांचे *मेरे सपनों का भारत बौद्धमय भारत* बनविण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहीले याला जबाबदार हेच लोक आहेत जे बाबासाहेबांचे विचार मानतात पण जाणत नाहीत,प्रत्यक्ष आचरणात आणत नाहीत.


          या लोकांना एक आदेश नसुन विनंती आहे की, *आपले बाबासाहेबांच्या पुतळ्यांना-प्रतिमांना हार घालण्याचं काम तर जोमाने करित आहोत,पण त्यांच्या विचारांचा तर रोजच मुडदा पाडला जातो याचं काय ?? हा प्रश्न स्वतःने स्वतःले प्रामाणिकपणे विचारावा असेच मला वाटते,कीमान स्वतःच्या निर्लज्ज व कृतघ्न पणाची लाज तरी वाटेल.....!


    जयभीम....


    ✍🏻संदिप आशा भिमराव....

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: