देशाचे भवितव्य बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते

 देशाचे भवितव्य बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते!


"थोर माणूस इतिहास घडवितो हा सिद्धांत तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका.तुम्हाला एवढे मान्य करावेच लागेल की, प्रत्येक देशात बुद्धिवादी लोक, सत्ताधारी वर्ग नसला तरी, प्रभावशाली वर्ग असतो.बुद्धिवादी वर्गास दूरदृष्टी असते,तो सल्ला देऊ शकणारा आणि आणि पुढाकार घेणारा वर्ग असतो. कुठल्याही देशात सामान्य जनसमुदाय स्वबुद्धियुक्त विचार आणि कृती असलेले जीवन जगत नाही. तो बहुतांशी अनुकरण करणारा असून बुद्धिवादी वर्गाचे अनुकरण करतो. देशाचे भवितव्य सर्वस्वी बुद्धिवादी वर्गावर अवलंबून असते असे म्हणण्यात अतिश्योक्ती नाही. 



हा वर्ग प्रामाणिक,स्वतंत्र आणि निर्लोभी असेल तर संकटसमयी पुढाकार घेऊन तो योग्य दिशा देईल असा भरवसा त्याच्यावर ठेवता येऊ शकतो. बुद्धी हा स्वायत्ता सद्गुण नाही हे खरे आहे. ती केवळ साधनमात्र आहे आणि साधनांचा उपयोग बुद्धिवादी व्यक्ती कोणत्या हेतूसाठी करते त्यावर अवलंबून असतो."


- डाँ. बाबासाहेब आंबेडकर

अनिहिलेशन ऑफ कास्ट (जातींचा विध्वंस) 

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel