✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मविषयक विचार

     🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मविषयक विचार

    ✍🏻🎯🎯🎯🎯🎯🎯


    1)मला असा धर्म आवडतो,जो स्वातंत्र्य,समता व बंधुतेची शिकवण देतो.


    2)भगवान बुद्धाची शिकवण ही शाश्वत सत्य आहे,पण तरीही ते असा दावा करत नाहीत की,ही शिकवण कधीही चुकणार नाही.


    3)बुद्धाच्या धम्मात काळानुरुप बदलण्याची क्षमता आहे.जी अन्य कोणत्याही धर्मात नाही.बुद्ध धम्माचे मूलतत्व काय आहे?जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केलात तर तुमच्या निदर्शनास येईल की,बुद्ध धम्म हा कार्यकारणभावावर आधारीत आहे.त्यात लवचिकता हा असा एक घटक आहे जो अन्य कोणत्याही धर्मात दिसून येत नाही.



    4)धर्म हा मुख्यतः तत्वावर आधारीत असला पाहीजे.नियमांवर आधारलेला असता किमा नये.ज्याक्षणी त्याचे अधःपतन होऊन परीणती नियमांमध्ये होते,धर्माचा अंत होतो.याचे कारण म्हणजे धर्मावरील जबाबदारी संपुष्टात येते,जी धर्माचा कणा/पाया असतो.


    5)जर आपल्याला अखिल भारताची अखंडता कायम ठेवावयाची असेल तर प्रत्येक धर्मग्रंथाचे सार्वभौमत्व संपुष्टात आले पाहीजे


    6)माणसे व त्याचा धर्म यांचे परीक्षण करण्यासाठी सामाजिक आचारसंहितेचे परिमाण आवश्यक आहे.जर तो धर्म माणसांच्या बनला असेल तर याव्यतिरीक्त दुसरे कोणतेही परीमाण येथे लागू होऊ शकत नाही.

    🎯🎯🎯🎯🎯🎯🎯


    संकलन-

    राजेश जुनगरे

    -यवतमाळ

    🔹🔸🔹🔸🔹🔸

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: