हृदयातले आ.बाळासाहेब आंबेडकर संपवू देणार नाही - दीपक केदार

 वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सूचित करण्यात येते की, दीपक केदार किंवा ऑल इंडिया पँथर सेनेचा वंचित बहुजन आघाडीशी कोणताही संबंध नाही. दीपक केदार वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नाहीत. तरीही दीपक केदार वंचित बहुजन आघाडी व अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावनिक दिशाभूल करत आहेत व बाळासाहेबांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहेत.

अॅड. बाळासाहेब आंबेडकरांचे नाव किंवा फोटो वापरण्यासाठी दीपक केदार यांनी बाळासाहेबांकडून कधीही परवानगी घेत नाही. दीपक केदार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाशी किंवा मोर्चाशी वंचित बहुजन आघाडी चा कोणताही संबंध नाही. त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात किंवा मोर्चात कोणी गेले तर ती त्यांची जबाबदारी राहिल पक्षाचा त्याला पाठिंबा नाही.


बाळासाहेबांच्या नावाचा वा फोटोचा दीपक केदार किंवा ऑल इंडिया पँथर सेनेने वापर केल्यास वंचित बहुजन आघाडी च्या स्थानिक जिल्हाध्यक्षांनी त्वरित अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचा किंवा नावाचा गैरवापर केल्याची पोलीस कंप्लेंट करावी.



अश्या सूचना कार्यकर्ते व पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी यांना देण्यात आल्या.


यावर बोलतांना दीपक केदार यांनी स्पष्ट पणे उत्तर देत बोलले की  आ.बाळासाहेब आंबेडकर हे आमचे हृदय आहे त्यांना आमच्या हृदयातुन कोणीही काढू शकत नाही.  गेल्या अनेक वर्षातील चळवळीत  मी इमानदारी काम करत आहे यांची दखल बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्यत का पोहोचू  दिली नाही. गेल्या अनेक वर्षा पासून बाळासाहेब आंबेडकरांपासून आम्हाला तोडण्याचे काम गेल्या जात आहे.पण ते कधीही शक्य होणार नाही. आम्हाला  बाळासाहेब आंबेडकर फोटो वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.. पण येत्या एका वर्षात  बाळासाहेब आंबेडकर यांच्या 1 लाख प्रतिमा कार्यकर्त्यांना भेट म्हणून देणार असेही ते म्हणाले. 

आ.बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मी नेहमी काम केले आहे आणि नेहमी काम करत राहील असेही दीपक केदार म्हणाले.


दीपक केदार यांची फेसबुक LIVE:-

https://www.facebook.com/officialambedkarmovement/videos/900764187537985/

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel