✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    घटोत्कच बुद्ध लेणी येथे धंमलिपि व शिल्पकला कार्यशाळा संपन्न | १६०० वर्षांनंतर पहिल्यांदा दोनशेहून अधिक अभ्यासक येथे एकत्रित हजर| |

     🎯घटोत्कच बुद्ध लेणी येथे धंमलिपि  व शिल्पकला कार्यशाळा संपन्न !


    🎯१६०० वर्षांनंतर पहिल्यांदा दोनशेहून अधिक अभ्यासक येथे एकत्रित हजर.


    औरंगाबाद -  प्राचीन भारताचा तसेच औरंगाबाद परिसराचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी आज  मुंबईसह, नाशिक , पुणे, नागपूर, बुलढाणा, बीड, जालना, कल्याण, परभणी येथील धम्म लिपिचे व बुद्ध लेणींचे अभ्यासक जंजाळा गावातील घटोत्कच बुद्ध लेणी येथे लेणी अभ्यास दौरा करण्यासाठी येथे काल २९ ऑगस्ट रोजी आले होते,  

            सातवाहन राज्यांचा गौरवशाली इतिहासाला उजाळणी देण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर बुद्ध लेणींची जनजागृती होण्यासाठी MBCPR टीमने  ह्या कार्यशाळेचे आयोजन केले होते, 

     

           घटोत्कच बुध्द लेणी अतिशय दुर्लक्षित बुद्ध लेणी असून ह्या लेणींवर कसल्याही सुविधा पुरातत्व विभागाने येणाऱ्या अभ्यासकांसाठी केलेल्या नाहीत, 

     ही लेणी महायानी पंथाची असून येथील शिल्पकला अजिंठा लेणीशी साम्य असलेली शिल्पकला येथे आपणास बघावयास मिळते,   व   लेणींच्या आतील शिल्पकलेची माहिती प्रभाकर जोगदंड व संतोष वाघमारे यांनी दिली, सूत्रसंचालन कविता खरे यांनी केले, 

    प्रस्ताविक भिकाजी सुरडकर यांनी केले, घटोत्कच लेणींचा इतिहास गौतम कदम यांनी सांगितला,  

    चैत्यगृह, भिक्कु निवास गृह, विहार,  सभा मंडप , भोजन गुहा , शून्यागार याची संपूर्ण माहिती उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून जाणून घेतला, 


           बुद्ध लेणींवर होत असलेले अतिक्रमण रोखण्यासाठी आपण सतत बुद्ध लेणींवर गेले पाहिजे , 

    प्राचीन बुद्ध लेणी ह्या संपूर्ण भारताचा वारसा असून त्याचे संवर्धन व जतन करणे सर्व भारतीयांचे कर्तव्य  आहे असे प्रतिपादन लेणी अभ्यासक लिपि तज्ञ सुनील खरे यांनी ह्या कार्यशाळे वेळी केले,

    संतोष वाघमारे यांनी चैत्यस्तुपाची माहिती दिली, प्रवीण जाधव यांनी बुद्ध रुपाबद्दल असलेले समज गैरसमज प्रबोधनातून दूर केले, उपस्थितांचे आभार शशिकांत निकम यांनी मानले,  धम्म दानाचे महत्व  संतोष अंभोरे व मनोज गजभार  यांनी समजावून सांगितले, विकास खरात यांनी  MBCPR टीमची वाटचाल व ध्येय सांगितले, 

    यावेळी MBCPR टीमच्या अधिकृत लोगोचे  उदघाटन यावेळी उपस्थित भगिनींच्या हस्ते करण्यात आले,

    घटोत्कच लेणी - अजंठा लेणीपासून काही मैल अंतरावर औरंगाबाद येथून अजंता लेणी रस्त्यावर तालुका सिल्लोडच्या पुढे सोयगाव तालुक्यामध्ये ही महायाणी लेणी आहे. गोळेगाव - अंबई - जिंजाळ रस्त्यावरील जंजाळा  गावाजवळील लेणीकडे जाण्याचा मार्ग गावाबाहेरील शेतामधून जातो.  डोंगराच्या घळीमध्ये उतारावर लेणी कोरलेली आहे. पुरातत्व खात्याने लेणीकडे जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केली आहे.  अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये डोंगरामधे गुप्तकालीन लेण्या आहेत. सुमारे इ.स. 5 वे शतकातील ही लेणी आहे. लेणीच्या माहितीचा पुरातत्व खात्याचा बोर्ड नासधूस केलेल्या तुटलेल्या आवस्थेमध्ये आहे. लेणीच्या बाहेरच्या बाजूस शिलालेखामध्ये या लेणीच्या दानाविषयी माहिती आहे. वाकाटक नृपती हरिषेण राज्याचा प्रधान वराहदेव यांनी बांधलेली लेणी आहे.  मोठे सभागृह असलेल्या लेणीमध्ये भिंतीमध्ये यक्षाने बसलेल्या आवस्थेत एका हातावर पेललेले चैत्यस्तूप कोरलेले आहे. गर्भगृहामध्ये सुमारे 20 फूटी तथागतांची धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत बसलेली मूर्ती यक्षासह कोरलेली आहे. खाली गतिमान होत असलेले धम्मचक्र कोरलेले आहे. सभागृहामध्ये अनेक अष्टकोणी आलंकृत खांब आहेत. खांबावर अनेक मूर्त्या कोरलेल्या आहेत.  लेणीच्या भिंतीवर असलेली रंगीत चित्रे नष्ट झालेली आहेत. अनेक लेण्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. या लेणीमध्ये जाण्यासाठी दोन दरवाजे असून दोन खिडक्या आहेत. लेणीचा दरवाजा व खिडक्या, जाळ्या आता सर्व तोडलेल्या आहेत. वज्रपाणी व पद्मपाणी बोधिसत्वांच्या व गौतम बुध्दांच्या बसलेल्या आसनामध्ये अनेक मूर्त्या लेणीमध्ये कोरलेल्या आहे. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ सातफण्यांचा नागावर असलेली मूर्ती आहे. अनेक मुद्रांमध्ये गौतम बुध्द व बोधीसत्वांची मूर्ती कोरलेली आहे. लेणीच्या खालच्या बाजूस अलंकारयुक्त पाणपोढी आहे. काल्पनीक महाकाव्य महाभारतातील भिम व हिडिंबा राक्षसीन यांचा मुलगा घटत्कोच कर्ण याचेकडून मारला जातो अशी दंतकथा आहे. अजंठा बौध्द लेणीजवळ असलेली हिनयानी बौध्द लेणीचा व महाभारताचा काहीही संबंध नाही तरीही या लेणीस घटोत्कच लेणी असे नाव दिलेले आहे. लेणी मोडकळीस आलेली असून पुरातत्व खात्याचे लेणीकडे दुर्लेक्ष आहे लेणीची काळजी घेण्याची गरज आहे नाहीतर लवकरच ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.


           कार्यशाळेस आलेल्या सर्व उपसकांची जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जंजाळा गावातील स्थानिक लेणी संवर्धक समितीने केली होती, 

    सकाळच्या नाश्त्याची, चहाची  व्यवस्था व रात्रीच्या राहण्याची व्यवस्था औरंगाबाद मधील डी के त्रिभुवन , सचिन खरात व अमोल बोर्डे यांनी केली, 



    ह्या कार्यशाळेत  राहुल खरे, विजय कापडणे, सिद्धार्थ अहिरे ,  शिवदास दोंदे , आनंद खरात, संतोष वाघमारे, सचिन खरात, सुनील खरे , प्रभाकर जोगदंड,विजय कापडणे  विकास खरात  कविता खरे, शशिकांत निकम ,गौतम कदम, प्रविण जाधव  , संतोष आंभोरे , आशिष भोसले, भिकाजी सुरडकर, अमोल बोर्डे 

    सुधीर भालेराव,  सचिन गायकवाड अनिल बागुल

    पुरुषोत्तम दातार धर्मेंद्र झाल्टे ,प्रज्ञा झाल्टे , वंदना झाल्टे    ,वैशाली शेलार ,कृष्णाजी साळवे , विनोद साठे ,राजेंद्र दाभाडे तसेच  इतर मोठ्या संख्येने धंम लिपि अभ्यासक उपस्थित होते.

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: