धम्मदान म्हणजे काय ?


     उपासक उपसिकांच्या विनय नियमसंदर्भात अज्ञानाचा फायदा घेण्यासाठी 'मनुवाद्यांनी' पेरलेल्या पोटार्थ्यांनी 'धम्मदान' या पवित्र शब्दाचा अर्थ 'पैशांचे, गाडीचे वगैरे दान' असा प्रसारित केला. धम्मदानाचा आणि आर्थिक दानांचा दुरान्वयेही संबंध नाही.


मग धम्मदान म्हणजे नेमके काय ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या महाग्रंथात धम्मदान विषयक मार्गदर्शन केले आहे. सदर ग्रंथात पाचव्या खंडातील भाग तिसरा या ठिकाणी ११ ते १८ या सूत्रामध्ये धम्मदाना संदर्भात गाथा आलेल्या आहेत.

'धम्मदूत म्हणून तथागतांनी पूजनीय भिक्खुंना दाही दिशेला पाठविले. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, "धम्मदान हे सर्वच दानांपेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचे माधुर्य सर्व रसांपेक्षा श्रेष्ठ आहे. तृष्णेचा नाश सर्व दुःख नाशांपेक्षा श्रेष्ठ आहे.."

हे प्रतिपादन धम्मपदातील तृष्णा वर्गातील ३५४ गाथेवर आधारित आहे,

सब्बदानं धम्मदानं जिनाति सब्बरसं धम्मरसो जिनाति सब्बं रतिं धम्मरती जिनाति तण्हक्खोयो सब्बदुक्खं जिनाति ।।

याचा अर्थ असा की पूजनीय भिक्खु संघाने उपासक उपसिकांना देसनेच्या माध्यमातून दुःख मुक्तीचे धम्म तत्वे देण्यासाठी कृती करणे यास 'धम्मदान' अशी संज्ञा आहे.

म्हणजे पूजनीय भिक्खुने धम्मदान द्यावयाचे आहे. आणि गृहस्थांनी ते स्वीकारायचे आहे.

पण व्यवहारात धम्मदान या संज्ञेचा मूळ अर्थ विकृत करून उलटा क्रम होताना दिसतो. गृहस्थ पैसे वगैरे देतात आणि भिक्खु ते स्वीकारतात, या प्रक्रियेला धम्मदान असे भासवतात. खरे तर ते 'अर्थदान' आहे. भिक्खुना मांसाहार खाऊ घालणे म्हणजे 'आमिषदान' आहे. चिवर देने म्हणजे 'चिवरदान' आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे.

विनय नियमात आमिषदान आणि अर्थदान निंदनीय ठरविले आहे. ते भिक्खु/ भिक्खुनी पातीमोक्खनुसार निसग्गीय पाच्चीतीय (४:२०-४७) आहे.

थोडक्यात काय तर 'धम्मदान' हे गृहस्थांनी ८ प्रकारच्या पुरुषांनी सुशोभित पूजनीय भिक्खूसंघाकडून घ्यायचे असते. सबब अर्थदानाला धम्मदान म्हणून भासविणारा भिक्खु, उपासक हा तोतया आहे हे ओळखावे.
Previous article
Next article

2 Comments to

  1. अतिशय सुंदर पोस्ट आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद...🙏🏼

      Delete

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel