तरुणांनी नेहमी आपल्या पुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक तत्वज्ञान होय.त्यांनी आपल्या जीवनात अनेक तत्वज्ञान आत्मसात केले आहे.

आणि तसेच तत्वज्ञान तरुणांनी सुध्दा आत्मसात करावे. अश्या प्रकारचे आव्हान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तरुणांना केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३ जानेवारी १९३८ साली अस्पृश्य युवक परिषदेत तरुणांना उद्देशून भाषण करतांना म्हणतात " आजच्या प्रसंगी मी फक्त महत्वाच्या एकदोन गोष्टी सांगू इच्छितो. माझी चाळीशी उलटून गेली मी फक्त असल्याने मी आता युवक नाही. मनुष्याने आयुष्यात खाणे, पिणे व जनगे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये.खाणे पिणेहे जगण्यासाठी असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषण होण्यासाठी समाजसेवेचे असावे.खाण्याला काळ व ला भार असे जगणे असले काय नि नसले काय सारखेच . या बाबतीत सिद्ध नाटककार कै . गडकरी यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की , जोपर्यंत समाज आपली मानमान्यता ठेवतो तोपर्यंतच जगण्यात भूषण आहे ' नाही तर समाजास अप्रिय होऊन अगदी म्हातारा होऊन बिछान्यास खिळून अगर घरातील सुनामुलांच्या तिरस्कारास पात्र होऊन झिजून झिजून जगण्यापेक्षा त्या अगोदर आलेले मरण भूषणाचे असते .
मी एकेकाळी तरुण होतो तेव्हा माझ्या अनुभवाच्याच गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो . *तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे* . तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते . म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की , "तपा अंती फळ" . कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नत्तीचे असो कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत . माणसाने त्या कार्यासा स्वतःस वाहून घेतले पाहिजे . . . मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत , त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते . चहा प्यावा लागतो . त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही , हे योग्य नाही . कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही . जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे.२४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे . मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे .


 ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी तप केले पाहिजे ,श्रम केले पाहिजेत .मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो . आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते . जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो . हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये . ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल . हरेक तरुणात महत्त्वाकांक्षा असली पाहिजे . महत्त्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही . यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्त्वाकांक्षेचे बी प्रथम रुजले पाहिजे . आज आपण जेथे जेथे जाल मग ती मामलेदार कचेरी असो , कलेक्टरचे ऑफिस असो अगर कोई असो , दर ठिकाणी या पांढरपेशा भटा - ब्राह्मणांचाच सुळसुळाट झालेला दिसेल . या सर्व परिस्थिती वरून इतरेजणांना निराश होणे हे जरी स्वाभाविक असले तरी आज आपण निराश न होता मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरुन त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे . मला जरी मुंबईचा गव्हर्नर केले तरी ते कमीच होईल असे मानणारा मी आहे . हे सांगण्याचा मतलब इतकाच की , आपल्यापैकी दरेकाने उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून ती फलद्रूप करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे" तरुणांनी बंधूनी एक आत एक बाहेर असे करू नये. सत्य सोडू नका सत्याचा तत्कालीन विजय होय नसला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो.


आज आपल्या सर्व तरुणांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज या यावरुज दिसून येते.आज आपण तर अभ्यास हा मुळीच करत नाही. सोशल मीडियावर आपला  वेळ खर्च करत असतो. तो आपण किती पत खर्च करावा यावर विचार करणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातील आपण कोणते ध्येय स्वीकारले आहे या कडे लक्ष देऊन त्यावर मिळवण्यासाठी नेहमी पुढे राहावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हा अत्यंत महत्वाचा संदेश दिलेला आहे. आज आपण तरुण  - विद्यार्थी खरंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश स्वीकारत आहेत का..? यावर सर्व तरुणांनी विचार करण्याची गजर आहे

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel