✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    महामानव भगवान बुद्धांची ३२ लक्षणे...

     






    महामानव भगवान बुद्धांची ३२ लक्षणे


    भगवान बुद्ध महापुरूषांच्या ३२ लक्षणांनी युक्त होते. ती बत्तीस लक्षणे अशी -


    (१) सुप्रतिष्ठित पाद - ज्याचे पाय जमिनीवर बरोबर बसतात.


    २) ज्याच्या तळपायाचे सर्व आकार परिपूर्ण, बेंबी मासलयुक्त व सहस्त्र आर (spokes) असलेले चक्र असलेली


    ३) आयतपाणी रूंद घोटे असणारा


    ४) लांब बोटे (अंगुली) - लांब सडसडीत बोटे


    ५) मृदू तरूण हस्तपाद मऊ, देखणे हातपाय


    ६) जाल - हस्त पाद- बोटे एकमेकांशी समांतर जुळणारी गुल्फ असणे


    ७) उस्संखपाद पायाच्या वरच्या भागावर 


    ८) एडी जंघ हरिणासारखे राय असणे 


    ९) आजानुबाहू - न झुकता उभे राहिले असता गुडघ्याला हाताचे तळवे स्पर्श करणारे.


    १०) कोषाच्छादित परूष इंद्रिय 


    ११) सुवर्ण वर्ण - सुवर्णासारखी कांती (त्वचेचे तेज )


    १२) सूक्ष्म छबी नितळ त्वचा जिच्यावर धूळ चिटकत नाही. 


    १३) एकैक लोम - त्वचेच्या प्रत्येक छिद्रात एक रोम (केस)


    १४) उर्ध्वा लोम प्रदक्षिणासारखे (डावीकडून उजवीकडे) गोलाकार केसांचे टोक वरच्या बाजूला असलेले 


    १५ ) ब्रम्ह जू गात्र लांब सडपातळ शरीर (उंच सडपातळ बांधा) -


    (१६) सप्त उत्सद शरीराचे सातही अंग पूर्ण आकारसहीत


    १७) सिंह - पूर्वाध काया कंबरेच्या वरील छाती आदीचा भाग सिंहाप्रमाणे विशाल (रूंद छाती )


    १८) चिंतान्तरांस- दोन्ही खांद्याच्या मधील भाग चितपूर्ण असतो


    १९) न्यग्रोध- परिमंडळ- जितकी शरीराची उंची आणि तितकीच शरीराची रूंदी (दोन्ही हात पसरून) 


    २०) समवर्त स्कंध समान आकार असलेले खांदे असणारा


    २१) रसग्ग- सग्गो - सुंदर शिरा (रक्तवाहिन्या ) असणारा


    २२) सिंह हनु सिंहासारखी हनुवटी असलेला


    २३) चव्वालिस दन्त ४४ दात असलेला -


    २४) समदन्त एकसारख्या आकाराचे, पक्तीबद्ध दात असलेला 


    २५) अ - विवर दन्त दातांमध्ये फट नसलेला, एकमेकांना लागून दात असलेला -


    २६) सु- शुक्ल दाढ पांढरे शुभ्र दात व दाढ असलेला (शुभ्र दंतपंक्तिवाला )


    २७) प्रभूत जिव्हा लांब जीभ असलेला 


    २८) ब्रम्ह स्वर करविंक पक्षाच्या स्वरासारखा स्वर असणारा ( मधूर स्वरवाला)


    २९) अभिनील नेत्र - अलसीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण नेत्र असलेला (कजरारी आँखे )


    ३०) गो- पक्ष्म- गायीसारख्या काजलयुक्त लांब व दाट केस असलेल्या पापण्या असलेला


    (३१) भौंहो के बीच में श्वेत कोमल कपास सी उर्णा - दोन भुवयांमध्ये कापसासारखी मऊ व शुभ्र केसांची दाट ओळ


    ३२) उष्णीषशीर्षा डोक्याच्या मध्यभागावरील भाग पगडीसारखा उंचवटा असलेला. - ह्याशिवाय त्यांच्या चारही बाजूला एक व्यामभर प्रकाश पसरलेला राहत असे. त्यालाच तेजोवलय म्हटले आहे

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: