डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकांना जीवन कसे जगावे याचा दिलेला मूलमंत्र.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय लोकांना जीवन कसे जगावे याचा दिलेला मूलमंत्र...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण अनेक विषयांवर अभ्यास लेखन बघितलेले आहे.भारतीय समजायची लोकांसाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बदल घडून आणतांना त्यांनी अनेक समस्यांशी संघर्ष करावा लागला. आणि प्रत्येक संकटाला मात देत सर्वांना सर्व हक्क आणि अधिकार दिले. त्याच प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राजकीय चळवळ करीत असतांना विद्यार्थ्यांनी चळवळीत काम करू नये. असे आपल्या भाषणातून वेळोवेळी सांगत होते.
आजचें विद्यार्थी जास्तीत जास्त राजकारणात शिरलेले दिसतात.
आपले शिक्षण पूर्ण करत नाहीत, तर काही अपुरे किव्हा शिक्षण घेत असतांना सामाजिक आणि राजकीय बदल घडवून आणण्याचा प्रयन्त करतात असतात.असे केल्याने आपण सामाजिक आणि राजकीय बदल घडवू शकतो ! असा असणारा गैरसमज बदलून टाका. डॉ.बाबासाहेब आंबेडकर १०जानेवारी १९३२ साली यांनी अस्पृश्य समाजाच्या शैक्षणिक प्रगती विषयी भाषण करत असतांना, विद्यार्थ्यांना कळकळीने उपदेश देत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
"आपला व्यक्तिविषयक लौकिक वाढवणे व त्याचबरोबर आणि आपल्या समाजाची योग्यता वाढवणे हे केवळ शिक्षणावर अवलंबून आहे"
" विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असतांना त्यांनी आपल्यापुढे निरंतर "ज्ञानार्जन" हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही.ह्या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादक करावे. "समाजसेवेत पुढील आयुष्य विपुल काळ आहे. "विद्यार्थी दशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हीत हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर जी अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करिता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितासाठीपेक्षा शतपटीने हिणकस आहे". या तत्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय Myself.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हा अत्यंत महत्वाचा उपदेश केलेला आहे. आजचा विद्यार्थी राजकारण गुरफटलेले आहे.जरी त्याकाळी परिस्थिती वेगळी होती आणि सध्याची परिस्थिती जरी वेगळी असली तर तोच उपदेश आजही विद्यार्थ्यांना लागू होत आहे. आजच्या राजकारणात विद्यार्थी फक्त त्यांच्या पुढाऱ्यांना बघतात. ऐश, मौज- मजा बघतात आणि आपल्या हातून होणाऱ्या उत्कृष्ट सामाजिक आणि राजकीय कार्याला मुकतात.
आज विद्यार्थ्यांना खरंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना आणि तरुणांना कोणत्या प्रकारे आव्हान केले आहे ते समजण्याची नितांत गरज आहे. त्यानेच आपले सामाजिक राजकीय आणि आर्थिक शक्य होईल. समाज उन्नती नकीच करावी पण आधी ज्ञानार्जन होऊन सामाजिक उन्नती करावी..
संकलन
Ambedkar Movement Team,
तरुणांची डिजिटल चळवळ

Leave Comments
Post a Comment