बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर 'बुद्ध' होतात
बोधिसत्व गौतम सम्यक संबोधीनंतर 'बुद्ध' होतात.
ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ बोधिसत्व होता. ज्ञानप्राप्तीनंतर ते 'बुद्ध' झाले.
बोधिसत्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्व म्हणजे काय?
बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व!
बोधिसत्व बुद्ध कसा होतो?
बोधिसत्व हा क्रमाने जीवनाची दहा स्थित्यंतरे बोधिसत्व राहिला पाहिजे. बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे?
१. बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत 'मुदिता' (आनंद) प्राप्त करून घेतो. सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की, प्रथम अविचारी असलेला पण पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो . हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणिमात्राच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते.
२. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत त्याला 'विमलता' ( शुद्धता ) प्राप्त होते . यावेळी बोधिसत्वाने कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो. तो सर्वांना दया दाखवितो. तो लोकांच्या दुर्गुणांची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणांविषयी त्यांना नाउमेद करीत नाही.
३. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेत 'प्रभाकारी' अवस्था ( तेजस्विता ) प्राप्त करून घेतो. या वीर बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म व अनित्यता यांच्या सत्याचे त्याला पूर्ण ज्ञान आणि आकलन झालेले असते. आता त्याला फक्त सर्वोच्च ज्ञान मिळविण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करण्यास तयार असतो.
४. जीवनाच्या चवथ्या अवस्थेत तो 'अर्चिष्मती' ( अग्नीप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता ) प्राप्त करून घेतात. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान,चतुविध व्यायाम, इच्छाशक्ती आणि पंचशील यांच्यावर आपले चिन केंद्रित करतो.
५. जीवनाच्या पाचव्या अवस्थेत तो 'सुदुर्जया' ( जिंकण्यास कठीण अशी स्थिती ) प्राप्त करून घेतो . सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान होते.
६. जीवनाच्या सहाव्या अवस्थेत तो ‘अभिमुखी’ होतो या अवस्थेत पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण याची ‘बारा निदाने' पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते, आणि ‘अभिमुखी' नावाच्या त्या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणिमात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात अगाध करूणा उत्पन्न होते.
७. जीवनाच्या सातव्या अवस्थेत बोधिसत्व 'दुरङ्गमा' ( दूर जाणे ) ही अवस्था प्राप्त करतो. बोधिसत्व आता दिक्कालातीत असतो; तो अनन्ताशी एकरूप झालेला असतो तथापि, सर्व प्राणिमात्रांविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नाम - रूप अद्यापही धारण केलेले असते. एका बाबतीत मात्र तो इतरांच्यापेक्षा अगदी निराळा असतो. कमलपत्रावर ज्याप्रमाणे पाणी ठरत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहात नाही. तो आपल्या सहचारांतील तृष्णा शांत करतो परोपकारबुद्धी, सहनशीलता, व्यवहारचातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्व श्रेष्ठ प्रज्ञा यांची तो जोपासना करतो.
या अवस्थेत असताना त्याला धर्माचे ज्ञान होते; परंतु लोकांना समजेल अशा रीतीनेच तो त्याची त्यांना ओळख करून देतो. आपण व्यवहारचातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते लोकांनी त्याला कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो; कारण केवळ अज्ञानामुळेच लोकांनी त्याच्या हेतूबद्दल गैरसमज करून हे घेतले आहेत हे त्याला कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणिमात्रांचे कल्याण करण्याविषयीचा त्याचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा तीकडेही तो पाठ फिरवीत नाही, म्हणून दुदैव त्याला सन्मार्गावरून कधीही च्युत करू शकत नाही.
८. जीवनाच्या आठव्या अवस्थेत तो 'अचल' होतो. या बढळ अवस्थेत बोधिसत्वाला करावे लागणारे सर्व कष्ट संपतात. जे ते चांगले आहे ते ते तो स्वाभाविकतःच अनुसरतो तो जी जी गोष्ट करील त्या त्या गोष्टीत तो यशस्वी होतो.
९. जीवनाच्या नवव्या अवस्थेत तो 'साधुमति' होतो. ज्याने सर्व धर्म किंवा त्यांची जो कालातीत होतो अशाची 'साधुमति' ही अवस्थ असते. शास्त्रे आणि सर्व दिशा जिंकल्या आहेत, आणि त्यांचे त्याला पूर्ण आकलन झालेले असून प्राप्त होते.
१०. जीवनाच्या दहाव्या अवस्थेत तो ‘धर्ममेघ' होतो. बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टी प्राप्त होते.
बोधिसत्व हे दहा सामर्थ्य प्राप्त करून घेतात; कारण बुद्ध होण्यास त्यांची आवश्यकता असते.
बोधिसत्वाची स्थित्यंतरे होत असताना त्याने ही दहा सामर्थ्य मिळविली पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्याने "दहा पारिमिता "चाही परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे.
एक 'पारमिता' ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीपायरीने केला पाहिजे. एका जीवनावस्थेत एकच पारिमिता असली पाहिजे एकीच थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण त्यात असता कामा नये.
अशाप्रकारे बोधिसत्वाची दुहेरी तयारी झाल्यानंतरच तो 'बुद्ध' होतो बुद्ध हा बोधिसत्वाच्या जीवनातील कळस होय.
बोधिसत्वाच्या या जीवनावस्थांचा किंवा जातकांचा हा सिद्धांत देवांच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो.
जातकसिद्धांत हा बुद्धाच्या अत्युच्च शुद्धावस्थेच्या जीवनाचे सार यावर आधारलेला आहे.
अवतारवादात देवाच्या जीवनाची घडण पवित्र असावी अशी अपेक्षा नाही. अवतारवादी ब्राह्मणोक्त कल्पनेचा अर्थ इतकाच की, देव निरनिराळे अवतार घेऊन आपल्या भक्तांचे रक्षण करतो; मग त्याचे वर्तन अतिशय अशुद्ध आणि अनैतिक असले तरी चालते.
बुद्ध होण्यासाठी बोधिसत्व आवश्यक अशा दहा जीवनावस्थांतूनच गेला पाहिजे या सिद्धांतांला दुसऱ्या कोणत्याही धर्मावर तोड नाही. दुसरा कोणताही धर्म आपल्या संस्थापकाला असल्या कसोटीला उतरण्याचे आव्हान देत नाही.
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Leave Comments
Post a Comment