✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    असे होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज....

    आमचा राजा असा होता..... 


    1) ज्या समाजासाठी काम करायचे आहे.. त्या समाज्यातील गरीबीतुन आलेल्या आणि व्यक्तीची निवड करणे आणि त्यांच्या माध्यमातुनच ते परिवर्तन शक्य होईल म्हणुन मानगाव च्या परिषदेचे अध्यक्षपद शाहु महाराजांना डाँ.बाबासाहेबांकडे दिले.

     2) त्या काळातील मागासवर्गीयांनी उद्योग व्यवसाय करावा आणि तो चांगल्या प्रकारे चालावा, म्हणुन व्यवसाय करायला फक्त पैसेच दिले नाही तर त्यांनी चहाची टपरी चालु केल्यानंतर त्या काळात बरेच लोक त्यांच्या चहाच्या टपरीवर चहा पित नव्हते पण आपला राजा हा एकदम बारकाईने त्या घडामोडीवर लक्ष ठेऊन होता.. म्हणुन शाहु महाराज स्वतः त्या टपरीवर आपल्या राजवाड्यातील लोकांसह चहा पिण्यास जात होते. आणि त्या चहाचे पैसे ही देत होते.... ( सध्या आपल्यातील कोणी काही व्यवसाय चालु केला तर आपलीच लोक त्याच्याकडुन काही खरेदी करत नाही. पण मारवाडी आणि इतरांकडुन आपण खरेदी करतो.. ) कसा आपला माणुस पुढे येईल... मारवाडी लोक काहीही खरेदी करायचे असेल किंवा कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्या समाज्यातोल तो व्यवसाय कोण करतात का ते पाहतात, मग त्याच व्यक्तीकडुन खरेदी करतात,, ) 

    3) शाहु राजाने स्वतः मुंबईला येऊन बाबासाहेबांचे घर शोधुन त्याचा सत्कार केला,, ( जर शाहु राजानी ठरवले असते तर बाबासाहेबांना राजदरबारात पण बोलवले असते... ( पण आज काल आपल्यातील काही सुशिक्षित म्हणणारे आणि काही पैसेवाले त्यांना वाटते एखादे गरजु असेल किंवा काही मदत करायची असेल तर आपल्या घरी त्या व्यक्तीने यावे अशी अपेक्षा असते,,,) आज काल शाहु महाराजांची पण जात काढली जाते.असेच लोक जातीयवादी आहेत..असो, मंदिर निर्माण करणे कि , वस्तिगृह तयार करणे यासाठी प्रत्येक जाती धर्मातील विध्यार्थीसाठी वस्तिगृहे तयार करुन शिक्षणावर भर देणारे. शाहु राजे ,असे आणि यापेक्षा ही अजुन खुप चांगले गुण असणारे खरे रयतेचे राजे राजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन..


    - यश भालेराव...

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: