✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    नांदेड बौध्द तरुण हत्या- जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवा.!

                                        -डॉ. बाबासाहेब आंबेडकर


              तिसरा प्रश्न आपण आपल्या उन्नतीचे कार्य करीत असता आपल्यावर जो जुलूम होतो त्याचे कसे निवारण करावयाचे?

    तुम्हाला माहित आहे की, आपल्या विरुद्ध सर्व जग आहे आणि त्याला तोंड द्यावयाचे म्हणजे ते दोन प्रकाराने द्यावयास हवे.

    प्रथमतः आपण प्रत्येकाने आपल्या मनातील भीती नाहीशी केली पाहिजे. ज्या ज्या वेळेस आपल्यावर कोणताही जुलूम होईल त्यावेळेस जुलूम करणाऱ्याशी दोन हात करावयास न डगमगता तयार झाले पाहिजे. काय व्हायचे असेल ते होईल, त्याला भिण्याचे कारण काय आहे? तुमच्याजवळ आहे काय की ते हरपण्याची धास्ती वाटावी? तुम्ही मरणास देखील भिता कामा नये. इतके तुम्ही निर्भय झालात तरच तुमच्यावरील जुलूमांचा तुम्हास प्रतिकार करता येईल.



    -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    (संदर्भ- दि. ३१ डिसेंबर १९३७, पंढरपूर, सोलापूर जिल्हा अस्पृश्य राजकीय परिषद.)


    मित्रांनो बाबासाहेबांचे हे भाषण आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मध्ये वाचत होतो ते  मुद्दामहुन येथे टाईप करून उद्धृत केलेले आहे, बाबासाहेबांनी तब्बल ९० वर्षांपूर्वी सांगितलेला हा उपदेश आज आपण अंमलात आणायलाच हवा, आज नांदेड येथे बौद्ध तरुणाची सरंजामी जातीवादी समाजातील जातीवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली यामुळे खूप उद्विग्न झालोय. बाबासाहेबांनी सांगितलेला हा मार्ग आता आपणांस अंमलात आणायलाच हवा या मताचा झालोय आता मी. कुठवर हे निषेध अन पोस्ट करत राहायचं.

    अन्याय झाला की तिथेच प्रत्युत्तर द्यायचं हे आपल्या बौद्ध समाजातील सर्वांनी मनी ठासून भरायला हवे, सरका*रने ही आमच्यावरील अन्याय जर दूर होणार नसतील तर जशी शीख समाजाला आहे तशीच आम्हालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी. आपण आता संघटित राहून या जातिवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्यायच नाही हे ठाम मत बनले आहे. सर्व बौद्धांनी एकत्र येऊन जो कोणी अन्याय करेल त्याच्यावर चढाई करावीच लागेल तरच हे जातीवादी आपल्यावर अन्याय करताना मागेपुढे पाहतील अन्यथा यांचा माज उतरणार नाही.

    आता आपल्या समस्त बौद्ध समाजाला बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जुलूम करणाऱ्यांसोबत दोन हात करण्याची तयारी ठेवावीच लागेल. Prevention Of SC ST ATROCITIES ACT या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायलाच हवी, व जे अधिकारी यात कसूर करतील त्यांना थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी, आरोपींना तर फाशीच देण्यात यावी. या कायद्याचा जो सकारात्मक परिणाम यायला हवा तो येत नाहीये, कारण अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची उदासीनता म्हणून अन्याय अत्याचार अजूनच वाढलेले आहेत. यावर केंद्र सरकारने त्वरित पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

    खेड्यापाड्यातील बौद्धांना शस्त्र वापरण्याचा परवाना द्या.

    जातिवाद्यांचा अन्याय आम्ही आमच्या पद्धतीने रोखण्यास आता आम्ही तयारी करावीच लागेल.

    आरेला कारे आता करावेच लागेल. या जातिवाद्यांना जशास तसे ठेचावेच लागेल.

    -अ‍ॅड. विशाल वाघमारे

    उच्च न्यायालय, मुंबई.

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: