✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    तर तरुणांनो राजकारणात तुम्ही यशस्वी व्हाल:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे गौतम बुद्धांच्या नंतर झालेले एकमेव राजकीय तत्वज्ञानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारण करतांना विशेष म्हणजे साधन संपत्ती ला महत्त्व दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या निवडणूकिचा प्रचार करताना खूप पैश्यांची गरज लागलं होती. त्या काळी सुध्दा काँग्रेस ने विपुल प्रमाणत पैसा खर्च केलेले होता.ज्यांच्या हाती पैसा यांच्याच हाती न्याय हा अनुभव बाबांनी स्वतःच अनुभवलेला आहे.अस्पृश्य समाज आर्थिक सक्षम नसतांना सरजमशाह किंव्हा श्रीमंतावर केस झाली तर त्याची ओळख काढून त्याला बाहेर काढण्यात येत होते.



    आपला अस्पृश्य समाज आर्थिकतेने सक्षम नसल्याने आपली जास्त मदत करू शकत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चांगल्या प्रकारे माहिती होते.हीच गत येणाऱ्या भावी पिढीवर होऊ नये म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तरुणांना उद्देशून भाषण करतांना म्हणतात " तरुणांनो ! लेखणीला व्यापाराची जोड द्या,पैसा मिळवा शरीर कमवा म्हणजे राजकारणात तुझी यशस्वी व्हाल" डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्राचा मोठा अभिमान वाटतो. जर महाराष्ट्र व्यापाराच्या दृष्टीने मागे राहिला असेल तरी इथे धाडसी,ध्येयवान, निर्भीड आणि स्वराज्याचे रक्षण करणारे माणसे फक्त महाराष्ट्रात आढळतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्राबद्दलचा आदर व्यक्त होतांना आपल्याला दिसून येतो.



    तो काळ वेगळा आणि आता येणार काळ वेगळा आहे, सध्याच्या काळात सर्वांना समान संधी भेटलेली आहे. आपण शिक्षणा सोबत व्यापारात हातभार लव्हल्स पाहिजे उद्योगधंदे टाकाले पाहिजेत त्यातून येणाऱ्या पैशाचा वापरत समाजाच्या प्रगती साठी वापरावा. सामायिक परिस्थिती बदलल्या शिवाय राजकीय परिस्थिती दलणार नाही.

    त्यातूनच आपण आपली राजकीय परिस्थिती बदलण्यास यशस्वी होऊ.

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: