कविता - प्रज्ञासूर्या
Thursday, 4 June 2026
0
हे प्रज्ञासूर्या
तू छेदलास
मानवतेला आक्रसणारा
शोषणरुपी दैववाद
अन् दिधलास नव्याने
उजेडाचे भाषांतर करणारा
करुणामय धम्मवाद
तू नाकारलीस
माणसा-माणसातील
विषवल्ली वृत्ती
अन् निर्मिलीस नव्याने
अत्तदीप, प्रज्ञा, मैत्रीची
मानवी संस्कृती
तू घडवलास नव्याने
मानवी पूर्णांकाचा
प्रतीत्यसमुत्पाद
अन् रुजवलास इथल्या कणाकणात
वैश्विक सौहार्दाचा
प्रबुद्ध भारत
- आनंद रेखा दिलीप पवार
नांदगाव (नाशिक)
९४०५३६७४२७
Previous article
Next article


Leave Comments
Post a Comment