✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    विद्रोही कवी किरण मोरे यांच्या निवडक आंबेडकरी कविता

     विद्रोही कवी किरण मोरे यांच्या निवडक कविता




    आंबेडकर


    सगळी विशेषणे शेवटी पडतात....


    तुझ्या नावापुढे कारण डॉ. आंबेडकर....


    हे नावच एक विशेषण आहे आमच्यासाठी.


    ---


    दलितांचा प्रश्न


    दलितांच्या प्रश्नाचे इतर समाज समर्थन करत नाही....


    कारण दलितांचे प्रश्न हे त्यांच्यासाठी सामाजिक राहत नाही....


    ---


    भीमा


    भीमा तुझ्यामुळेच मला सर्वत्र मान आहे


    ओळख ही माझी तुझ्यामुळेच छान आहे...


    ---


    भीमा


    भीमा तू आभाळाएवढा


    तुला समजण्यासाठी मला


    अनेक जन्म घ्यावे लागतील......


    ---


    पुण्याई


    ओंजळ केलेल्या हाती


    बिसलेरी दिली आज..


    दुर्लभ पडणारे पाणी


    ओठी दिले आज..


    सांगू किती पुण्याई


    माझ्या भीमाची...


    जन्मापासून मृत्यूपर्यंत


    माणूस केले आज...


    ---


    महानायका


    ज्ञानसागर तू केलास रे किती हट्ट


    आम्हा सुधारण्याचा


    प्रज्ञासूर्य तूच ठरलास आमचा


    उद्धारकर्ता


    भारताला तूच केले रे


    गुलाममुक्त आम्हा


    बौद्धिसत्त्व तूच ठरलास रे


    आमचा मार्गदाता


    महानायका आज शतशः


    कोटी कोटी प्रणाम तुला..!


    ---


    भीमा


    सुख दिले तू इतके भीमा


    माझ्या "झोळीत" मावेना...


    अन्न दिले तू इतके भीमा


    माझ्या "तातात" मावेना...


    पैसा दिला तू इतका भीमा


    माझ्या "तिजोरीत" मावेना...


    आनंद दिला तू इतका भीमा


    की "गगनात" मावेना...


    सन्मान दिला तू इतका भीमा


    की माझा मलाच सहन होईना...


    ---


    लेखक परिचय :

    लेखक : किरण मोरे (विद्रोही कवी), 

    संपर्क - +91 81085 34199

    वसई


    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: