अजून रुजला नाही विचार बुद्धाचा - कवी कांबळे

 अजून रुजला नाही विचार बुद्धाचा

कवी कांबळे यांची सामाजिक वास्तवावर भाष्य करणारी कविता

(कविता)




करणाऱ्यांनी केला केवळ व्यापार बुद्धाचा

म्हणून अजून रुजला नाही विचार बुद्धाचा

रोहिणी नदीच्या पाण्यासाठी युद्ध अटळ होते

त्या युद्धालाच विरोध होता फार बुद्धाचा

खोटा आणि खोडसाळ आहे प्रचार लोकांचा

की नववा आहे विष्णूचा हा अवतार बुद्धाचा

राजांचा तो राजा अशोक चक्रवर्ती झाला

अखंड भारतात भरवला त्याने दरबार बुद्धाचा

छप्पर साली कांती झाली नाग नदीकाठी

बा भीमाने दिला आम्हाला आधार बुद्धाचा

ते भारावलेले लोक विजू, डोंगर कोसळ गेले

अन् दगडांनाही देऊन गेले आकार बुद्धाचा

पण त्यानंतर...

करणाऱ्यांनी केला केवळ व्यापार बुद्धाचा

म्हणून अजून रुजला नाही विचार बुद्धाचा

✍️ कवी : कवी कांबळे

📍 जालना, महाराष्ट्र

📞 ८८८८९६९१३०

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel