✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ☸️ सारनाथ या पवित्र स्थळाचा जागतिक वारसा (UNESCO World Heritage) यादीत समावेश!


    बुद्ध नाथांनी धम्माचे सारे सार पंचवर्गीय भिक्षूंना सांगितले. धम्मचक्र गतिमान केले. ते ठिकाण म्हणजे सारनाथ. ज्ञानप्राप्तीनंतर गया पासून दुब्बा- देहरी- सासाराम- बाहुआ-मुरमुरिया- मुघलसराई अशी पदयात्रा करीत बुद्ध ऋषिपतन मृगदाय वन ( म्हणजेच सारनाथ ) येथे आले. या पदयात्रे दरम्यान आताच्या चंदनपिर पहाड, मुर मुरिया, पिठिया पहार टेकड्या येथे त्यांनी वास्तव्य केले. तसेच सासाराम, दुब्बा, बसाह, भरारी कलान अशा अनेक गावांना त्यांनी भेट दिल्या. या प्रत्येक ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे अवशेष आज ही दिसून येतात. सम्राट अशोक यांनी या मार्गावर ठिकठिकाणी उभारलेले शिलालेख पाहता याची खात्री पटते. म्हणूनच सारनाथ हे नुसतेच पवित्र स्थळ नसून धम्म ऊर्जेचे मोठे ठिकाण आहे.

    sarnath-buddhist-heritagev-and-kanheri-caves-mumbai


    काल जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश झाल्याची बातमी मिळाली. याबाबत प्रस्ताव सादर करताना देखील मी लिहिले होते. बौद्ध संस्कृतीच्या सर्व प्राचीन स्थळांचा समावेश जागतिक वारसा यादीत यावा यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. मुंबईतील बोरिवली येथील कान्हेरी लेणी हे स्थान देखील एके काळचे प्राचीन विद्यापीठ आहे. घारापुरीला जसा जागतिक वारसा मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच प्रयत्न कान्हेरी लेणी स्थळासाठी केले पाहिजेत. तरी महाराष्ट्र शासनाने आणि पुरातत्त्व खात्याने यासाठी विशेष पुढाकार घ्यावा. तेथील हरित पट्ट्याचे संरक्षण करावे. जंगलामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि कान्हेरी लेणी यांना शोभा आहे.


    लेखन - संजय सावंत 

    संपर्क - buddhistcaves@gmail.com

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: