✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग -1

    दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण


    लेख -

    रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत


    ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


    • बळी राजा : एक काल्पनिक पात्र :


    बळी राजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळी राजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्या बाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शि
    वाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळी बाबत संदर्भ सापडतात. ते फक्त आणि फक्त पुराण कथेतच बाकी कोणतेही पुरावे नाहीत.


    बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती? याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो - "इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो." या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही.


    बळी राजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळी राजा हा शेतकरी राजा आहे, पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि - बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळी बाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासातील असेल तर तो बळी राजा दुसरा तिसरा कोणी नसून सम्राट अशोकच असू शकतो  कसे काय ते पाहण्यासाठी बळीच्या कथेचा सारांश घेऊया.


    • कथा बळी राजाची :


    अशा ह्या बळी राजाची कथा पुराणांमध्ये आलेली आहे. पुराणे म्हणजे गोष्टी रूप इतिहास आणि इतिहास स्वरूप गोष्टी. त्यातील खरे खोटे तपासता येणे अवघड. या कथा मौखिक परंपरेने चालत आलेल्या. कीर्तनात, चातुर्मासात, कथांत सांगितल्या जाणाऱ्या. ज्याने त्याने हव्या तशा रंगवाव्या. त्यामुळे सर्वच कथांचे वेगवेगळे पाठ मिळतात. मूळ पाठ अशी काही चीज अस्तित्वात नसतेच. त्यामुळे असे आणि असेच घडले असे कुणी पुराणांतील गोष्टीं बद्दल ठासून सांगू लागला तर तो मनुष्य अज्ञानी किंवा वाह्यात आहे असे पक्के समजावे. अशा लोकांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढल्याने हे शब्द वापरले.


    बळी राजाची गोष्ट वापरून ब्राह्मण द्वेष पसरविण्याऱ्यांचा हेतू काय असू शकतो याचा विचार करण्यास हरकत नाही. बळी राजा हा अत्यंत पराक्रमी होता हे त्याचे पहिले वैशिष्ट्य होते. त्याने शंभर अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेघ यज्ञ म्हणजे सरळ सरळ लढाईचे आव्हान. त्यात तो जिंकत चालला. इतका की शंभराव्या यज्ञाची यशस्विता म्हणजे स्वर्गाचे राज्यही त्याला मिळणे. इंद्राने आता गादी सोडायची वेळ आली तेव्हा देव विष्णुकडे गेले व काही उपाय काढण्याची विनंती केली. सरळ लढाई शक्य नसल्याने विष्णुने बटु वामनाचे रूप घेतले व तो यज्ञ स्थानी गेला आणि त्याने दान मागितले.


    दानशूरपणा हा बळी राजाचा मोठा गुण होता. त्याने जे मागाल ते देईन असे म्हटले. वामनाने तीन पावले भूमी मागितली. बळी राजाने होय म्हटले. वामनाने पहिल्या पावलाने स्वर्ग व दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवायला जागाच उरली नाही. तेव्हा बळी राजाने आपल्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितला. वामनाने त्याप्रमाणे करून बळीला पाताळात गाडला. अशा दानाने संतुष्ट झालेल्या वामनाने मग बळी राजाला वर मागण्यास सांगितले. बळी राजाने वामनाचा कायमचा सहवास मागितला. तेव्हा पाताळाचा राजा झालेल्या बळी राजाचा द्वारपाल म्हणून आजन्म त्याच्या नजरे समोर राहण्याचे वामनाने मान्य केले. तसेच दिवाळीचा आजचा दिवस त्याच्या नावाने ओळखला जाईल असा वर ही दिला. या कथेचा असा अर्थ लावला की हा लढा शोषक आणि शोषित यांच्यातील अाहे व त्यात जो शेतकऱ्यांचा कैवारी असा गुणी बळी राजा होता त्याला ब्राह्मणांनी कपटाने देशोधडीला लावला, शेतकऱ्यांचे राज्य बळकावले.


    काही जण याचा अर्थ ब्राह्मण वामनाने शेतकरी बळीचा खून केला येथवर नेऊन ठेवतात. बळी राजाची गोष्ट फार जुनी आहे. त्या काळी वर्ण व्यवस्था प्रचलित होती. तो मोडून काढणारा असा बळीचा उल्लेख कुठे ही नाही. त्या काळी सामान्यपणे क्षत्रियाचे राज्य असे. ब्राह्मणाचे असल्यास तसा उल्लेख असतो. जसा रावण हा ब्राह्मण असून ही राजा होता. हे वेगळे म्हणून सांगावे लागते. दशरथ क्षत्रिय होता, हे सांगावे लागत नाही.


    तात्पर्य :

    बळी हा एक क्षत्रिय राजा होता. बळी राजा यज्ञ करीत असे. वामन दान मागायला यज्ञ स्थळी गेला होता. थोडक्यात बळी राजा यज्ञ संस्थेचा पाईक होता. यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण लागतात. ते पुरोहित म्हणून यज मानाच्या नावे यज्ञ करतात. बळी राजाचे शंभर यज्ञ झाले म्हणजे ब्राह्मण व बळी राजा यांचे चांगलेच सख्य होते. बळी राजाने सर्व पृथ्वी आपल्या अंमला खाली आणली होती. याचा अर्थ त्याची ताकद विलक्षण होती व ती इतर साऱ्या राजांनी मान्य करून त्याचे मांडलिकत्व तरी स्वीकारले किंवा पराभव तरी स्वीकारला. प्रत्यक्षात दोन्ही गोष्टी घडल्या असणार परंतु त्याचा तपशील उपलब्ध नाही व असला तरी फार महत्त्वाचा नाही. ज्यावेळी अशा गोष्टी म्हणजे आपले राज्य दुसऱ्याला देणे. त्यावेळी दहशत, भीती, रक्तपात ह्या गोष्टी अटळ असतात. कुणी ही आपली गोष्ट हौसेने वा विनाकारण दुसऱ्याच्या हाती देत नाही व दास्य पत्करत नाही.

    क्रमशः...


    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: