Buddha Teach
Constitution
Dr babasaheb Ambedkar
दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग -2
Friday, 27 March 2020
0
● दुसरी बाजू :
बळी राजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आज ही शेतकऱ्याला बळी राजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी दसऱ्याला आमच्या माता बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो!” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळी राजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य - वामन याने बळी राजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तर पाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भाल देव बसवतात.
१५ दिवस सुतक पळून बळी राजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळी राजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळी राजाच्या मंत्रि मंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत. बळी राजाचे राज्य नऊ खंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळी राजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याच प्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय.
प्रत्येक खंडात छोटे छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याच प्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळी राजाचीच पूजा होते, असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांची ही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन - परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.
बाहेरून आलेल्या परकीय आर्यभटाने कपटाने बळी राजाला ठार मारले व राज्य बळकावले. तेव्हापासून आपण सर्व दुःखात आहोत. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन (विष्णूचा अवतार) याने बळी राजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळी राजाला पाताळात गाडले, ही भाकड कथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग आदी आपल्या फायद्याचे आयोग हे आर्यभट आजही दडपून टाकत आहे. आज या बळी राजाचे रूप असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. या आर्यामुळे देशात जातीभेद, स्त्री - पुरुष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला बळी राजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेवून सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल.
• बळी राजा :
प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्गुणी, प्रजा हित दक्ष व सामर्थ्यशाली असा विख्यात दैत्यराज. पुराण कथेनुसार हा सप्त चिरंजीवांपैकी एक आहे. विष्णूने वामनावतारात याच्या मस्तकावर पाय ठेवून याला सुतल नावाच्या पाताळात गाडले, अशी कथा आहे. हा प्रल्हादाचा नातू व विरोचनाचा मुलगा होय. विरोचनाच्या देवी वा सुरूची या पत्नीपासून याचा जन्म झाला. त्याला विंध्यावली, अशना इत्यादी भार्या होत्या. त्याला अशना नावाच्या स्त्रीपासून बाणसुर हा पुत्र झाला (भागवत ६.१८). भागवतातच बाणाच्या आईचे नाव कोटरा असे आढळते (१०.६३). त्याला १०० पुत्र होते, अशी कथा असून त्याचे बाण, कुंभगर्त इत्यादी पुत्र प्रसिद्ध होते. शकुनी व पूतना या त्याच्या दोन मुली होत. बळीच्या नातीचा म्हणजेच बाणा सुराची कन्या उषा हिचा विवाह कृष्णाच्या अनिरूद्ध नामक नातवाशी (प्रद्युग्नाच्या मुलाशी) झाला होता. महाबलीपुर ही त्याची राजधानी होती. तो अत्यंत सामर्थ्यशाली असल्यामुळे त्याला नुसते बळी असे न म्हणता महाबळी असे म्हणत असत.
बळी व इंद्र यांच्या संघर्षाची वर्णने पुराणांतून वारंवार आढळतात. या संघर्षातून आर्य व अनार्य यांचा संघर्ष सूचित होतो. यथासांग नसलेल्या, विशेषतः दक्षिणे शिवाय केलेल्या कर्मांचे फळ बळीला मिळते, या संकेता वरून ही हा संघर्षच सूचित होतो. एकदा बळीने इंद्राचा पराभव करून त्याच्या संपत्तीचे हरण केले होते. ती संपत्ती समुद्रात पडली; तेव्हा ती परत मिळविण्यासाठी (वा अमृत मिळविण्यासाठी) देवांनी बळीच्या मदतीने समुद्र मंथन केले (भागवत ८.६; ८.८). त्यानंतर अमृतासाठी झालेल्या युद्धात मृत झालेल्या बळीला शुक्राचार्यांनी जिवंत केले. त्याने पुन्हा इंद्राला जिंकले आणि इंद्र पद मिळविले.
एकदा बढाई मारल्यामुळे प्रल्हाद त्याला राज्य नाशाचा शाप दिला; विष्णूला भूमीचे दान देऊ नकोस, असे शुक्राचार्यांनी सांगितले असताना ही त्याने त्यांचे ऐकले नाही, म्हणून शुक्राचार्यांनी ही त्याला असाच शाप दिला; त्याने एक विश्वजित याग व १०० अश्वमेध यज्ञ केले होते; त्याला सोडविण्यासाठी रावण पाताळात गेला असता, ते तुला जमणार नाही, असे म्हणून बळीने त्याला परत पाठविले; रावण त्याला जिंकण्यासाठी पाताळात गेला असता रावणाला अपमानित होऊन परत जावे लागले इत्यादी कथा आढळतात.
प्रल्हादाच्या उपदेशानुसार बळीने अत्यंत न्यायाने राज्य चालविले. कार्तिक शु. प्रतिपदा ही त्याच्या स्मृति प्रीत्यर्थ बलिप्रतिपदा म्हणून साजरी केली जाते. हा विक्रम संवताचा प्रारंभ दिन असून हिंदूंच्या साडे तीन शुभ मुहूर्तां पैकी हा अर्धा शुभ मुहूर्त मानला जातो. वामनाने याच दिवशी बळीचा पाडाव केला होता. बळीकडे तीन पावले जमीन मागून दोन पावलांनी पृथ्वी व आकाश व्यापल्या नंतर त्याने तिसरे पाऊल बळीच्या मस्तकावर ठेवले होते. त्या दिवशी तांदळांनी बळीची आकृती काढून वा त्याचे पंचरंगी चित्र काढून त्याची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याचा ही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया - पुरूषांना ओवाळताना ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असे म्हणतात. यावरून प्रजेच्या मनातील त्याच्या विषयीचा आदर स्पष्ट होतो.
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात केरळ मध्ये ओणम् नावाचा सण साजरा केला जातो. त्या दिवशी बळी आपल्या प्रजेला भेटावयास पृथ्वीवर परत येतो, आपले दुःख त्याला दिसू नये म्हणून प्रजा उत्सव साजरा करते आणि प्रजा सुखी आहे, हे पासून तो आनंदाने परत जातो, अशी समजूत आहे. बळी पाताळात गेला, याचा अर्थ त्याने केरळात राज्य स्थापन केले असावे, असे अभ्यासकांचे मत आढळते. पंडित सातवळेकरांच्या मते त्याने कोकणात राज्य स्थापन केले असावे. कन्या कुमारीच्या दक्षिणेला समुद्रात गेलेल्या एका भू - शिरावर त्याची राजधानी होती, असे उल्लेख तमिळ वाङ्मयात आढळतात. त्रिविक्रम वामनाने बळीला पाताळात ढकलले, या विषया वरची अनेक शिल्पे दक्षिणेत आढळतात.
क्रमशः...

Previous article
Next article

Leave Comments
Post a Comment