✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    पूराणे आणि स्मृती यामध्ये उल्लेख झालेले आणि भारतच्या ऐतीहासिक बुध्दिस्ट राजघराण्यातील राजांची यादी

    मित्रानो,आज नवीन आणि महत्वाच्या विषयाला हात घालत आहे!विषय महत्वाचा या साठी आहे की पूराणे आणि स्मृती यामध्ये उल्लेख झालेले आणि भारतच्या ऐतीहासिक बुध्दिस्ट राजघराण्यातील  राजांची यादी आपल्या माहिती साठी उपलब्ध करून देत आहे, यापैकी बऱ्याच राजांना इतिहास आपल्याला माहित आहे , आणि  राज्यांच्या नावा बाबत, बरेच जन अनभिज्ञ आहेत.    अनेक राजांचा उल्लेख पुराणे, रामायण, महाभारत इतकेच काय वेदांत सुद्धा आहे, अनेकांची वरील साहित्यात स्तुती गायली आहे उदा. द्यायचे झाले तर जन गन मन....... देता येईल. ज्या राजांचा उल्लेख झाले आहेत ते खालील प्रमाणे आहेत,
    1) सातवहन राजघराणे - लंबोदर
    2) मौर्य राजघराणे- दशरथ
    3) कुशाण राजघराणे- पहिला वासुदेव,    दुसरा   वासुदेव
    4)कदम्ब (कर्नाटक)राजघराणे - भगीरथ, रघुपती
    5) कदम्ब (हळेबिडू) - कृष्ण ,विष्णु
    6)गुप्त राजघराणे - घटोत्कच,पुरु,नरसिम्हा, विष्णू
    7) राष्ट्रकूट - अभिमन्यू, पहिला/दुसरा/ तिसरा इंद्र, पहिला/दुसरा/तिसरा गोविंद, कृष्ण
    8)गंगवंश - पहिला/दुसरा/तिसरा माधव
    9) विष्णकोंडी राजवंश - गोविंद, माधव, इंद्र,
    10) मैत्रक राजवंश-  द्रोण, ध्रुव
    11)काश्मीर - युधिष्ठीर,
    12) कार्कोट-  बृहस्पती
    13)चालुक्य - पहिला/दुसरा/ तिसरा भिम, कर्ण,
    14) कलचुरी(माहिष्मती) - कृष्ण,शंकर,बुद्ध
    लक्ष्मन,कर्ण,
    15) चाहमान - वासुदेव,लक्ष्मण,
    16) पाल राजवंश - गोपाल
    17) शिलाहार - नागार्जुन,इंद्र,भिम
    18) यादव राजवंश - कृष्ण,महादेव, रामचंद्र, शंकर ,
    19) होयसळ - बल्लाळ, नरसिंग
    20) काकतीय(आंध्रा प्रदेश) - महादेव, गणपती, सद्रांबा (गणपतीची कन्या)
    21) राठोड राजवंश - अश्वथामा, काना, गंगा
    22) विजयनगर - हरिहर, रामचंद्र, मालिकार्जुन
    23) आरविंडू राजघराणे - राम,तिरूमल, श्रीरंग, वेंकतपती.।

      वरील राजघराण्यातील बहुसंख्य राजे बुद्ध धम्म अनुसारणारे बौद्धधम्मीय होते. त्या-त्या राजाला खुश करण्यासाठी स्तुती ( स्मृती) लिहिल्या गेल्या, त्यांना खुश करण्यासाठी त्याची स्मारके(मंदिरे) उभारून ,ज्या प्रमाणे आज देणग्या उकळ्या जात आहेत त्याच प्रमाणांत राजांना खुश करून मोठं मोठया देणग्या प्राचीन काळी लाटल्या गेल्या,  प्रतिक्रांती नंतर, शिक्षण, मालमत्ता संग्रह  व शस्र धारणास बंदी करून हळू हळू या राजघराण्यांच्या इतिहासाला नष्ट करून पुरानांत भाकड कथा घुसवून पुन्हा निर्माण केल्या, यामुळे बुद्धीस्ट राजांचा इतिहास आपल्याला उपलब्ध होत नाही या बद्दल  सर्वाना प्रश्न पडतो की सहाव्या सातव्या शतकानंतरचा पुरानात्मक आणि महाकव्यात्मक  भ्रष्ट कथा लोकांच्या माठी मारून,त्यांना आपल्या उज्वल इतिहासापासून व राजांपासून अनभिज्ञ
    ठेवण्याचे जातीयवाद्यांचे  षडयंत्र यशस्वी झाले आहे,तरी ज्याला- ज्याला शक्य होईल त्याने या आपल्या उज्वल इतिसाचे संशोधन करून,या महाकाव्यात, स्मृतीत, वेदात, पुराणात अडकलेल्या आपल्या बुध्दिस्ट राजांची मुक्तता करावी आणि खरे सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करावा, याची सुरुवात माझ्या पासून झाली,याबद्दल मला अभिमान वाटत आहे, आपणाही वाटावा .
     .......दिनकर सोनकांबळे 9892756702 ( कृपया  पोस्ट नावासहित फॉरवर्ड करावी.)
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: