✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    सध्याचे लाफिंग बुध्द म्हणजे बुद्धांना प्रश्न विचारणारे यक्ख होय..

    स्तुप व लेण्यांवर अशा मुर्त्या सर्वत्र आढळून येतात ..
    यांना पाली साहित्यात " यक्ख " असे म्हणतात ..
    बुध्द चरित्रात असे अनेक यक्ख भेटल्याचे उल्लेख आहेत ..या यख्खांनी वेळोवेळी तथागतांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत ..त्यांना तथागतांनी दिलेली उत्तरे सुत्तपिटकात आपणास अभ्यासायला मिळतात ..
    हे यख्ख तत्कालीन गणांचे पहारेकरी ( रक्षक ) असत..
    पुढे जेंव्हा स्तुप व लेण्या निर्माण झाल्यात तेंव्हा या यक्खांना अशा प्रकारे साकार करण्यात आले ..ही तत्कालीन शिल्पकारांची अभिव्यक्ती होती ..

    याच यख्खांना संस्कृत भाषेत " यक्ष " म्हणतात ...
    हा यख्ख ( यक्ष )  पितळखोरा लेणीवर होता ..आज तो दिल्लीच्या नँशनल म्युझियम मध्ये आहे ..
    या मुर्तीचा एक हात तुटलेला आहे ..पण त्याचे दोन्हीही हात डोक्यावरील परडीला लागलेले होते ..
    या मुर्तीच्या हातावर एक शिलालेख कोरलेला आहे ..तो धम्मलिपी व धम्म भाषेत आहेत ..ही मुर्ती एका सोनाराने दान दिल्याचा उल्लेख त्या शिलालेखात आहे ..
    बुध्द तत्वज्ञान जसे भारतातून विदेशात गेले तशीच बौध्द शिल्पकला देखील विदेशात गेली ..
    हे यक्ष देखील विदेशात गेले ..याच यक्षाच्या मुर्त्यातून विदेशात उत्क्रांती झालीय ..यक्षांचे परिवर्तन " लाफींग बुध्दात|  " झाले ..
    आज देश - विदेशात बुध्दमुर्ती , अवलोकितेश्वर पद्मपाणी , वज्रपाणी , तारा , लाफिंग बुध्दांच्या मुर्त्यांची प्रचंड मागणी आहे ..या मुर्त्यांचा व्यापारामध्ये दिवसेनदिवस वाढ होत आहे ..
    भारतीय उद्योजकांनी व बेरोजगारांनी लेणी शिल्पांच्या प्रतिकृती निर्माण करण्यावर भर दिला पाहीजे ..
    पुरातत्वखाते , सांस्कृतिक मंत्रालय , व उद्योग खाते ह्यांनी त्या बाबत भरीव कार्य केले पाहीजे ..
    भारतीय शिल्पकला व लेण्या यांचा अभ्यास करण्यासाठी विदेशी लोकांचे लोंढे दरवर्षी भारतात येतात ..
    यातून परकिय चलन मिळतेच ..
    त्याच शिल्पांच्या प्रतिकृती जर त्यांना मिळाल्यात तर ते आनंदाने विकत घेतील ..
    आणी देशातही अनेकांच्या दिवाणखान्यात गृहसजावटी साठी उपलब्ध होतील ..
    आजही अजिंठा लेणीतील पद्मपाणी शिल्प वा चित्र अनेकांच्या दिवाणखान्यात मानाच्या स्थानावर बसलेले आढळून येते ..ह्यामध्ये कलात्मकता शोधली पाहीजे ..
    कलेचा प्रसार व उद्योजकता हा हेतू असला पाहिजे ..
    महेन्द्र शेगांवकर
    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: