डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा या व्यक्तीकडून प्रेरणा घेतली होती.:-

“आल्पस्” पर्वत आणि “करोना” (नक्की वाचावे)

नेपोलियन बोनापार्ट चा जन्म फ्रांसमध्ये १७६९ मध्ये झाला होता आणि तो १८०४ ते १८१५ मध्ये राजा होता. ज्याच्या शब्दकोशात ‘अशक्य’ हा शब्द नव्हता. खरं म्हणजे तो म्हणायचा “फक्त मुर्खांनाच कुठलीही गोष्ट अशक्य वाटते”.

त्याला एकदा आल्पस् पर्वताच्या पलिकडे युध्दासाठी जायचे होते. आल्पस् पर्वत तोपर्यंत कुणीच पार केला नव्हता. असाध्य अशीच गोष्ट होती ती. नेपोलियन त्याच्या सैन्यासहीत स्वारीवर निघाला. त्याचे सैनिक चिंतेत होते. घाबरले होते. वाटेत नेपोलिअन ला एक म्हातारी भेटली.
ती त्याला म्हणाली “तू तुझ्या सैन्याला घेवून माघारी फिर. आतापर्यंत ज्याने ज्याने आल्पस् पर्वत पार करायचा प्रयत्न केला, कुणीच जिवंत परत आलेलं नाही.”

हे ऐकल्यावर त्याचे सैनिक अधिकच घाबरले. पण नेपोलिअनने आपल्या गळ्यातला हार काढला आणि त्या म्हातारीला बक्षिस दिला. नेपोलिअन म्हणाला “आज्जी, तुझ्या या बोलण्याने माझा हौसला अजून बुलंद झाला. चला रे सैनिकांनो!”

नेपोलिअन आपल्या सैनिकांना पुढे म्हणाला “मी तुम्हाला आल्पस् पर्वताच्या पायथ्याशी घेवून जातो. तुम्ही पर्वत पाहून नंतर ठरवा आपण पुढे जायचे की नाही. तुम्ही म्हणालात तर तेव्हा आपण मागे फिरू”

हे ऐकल्यावर सैनिक उत्साहाने तयार झाले आणि सर्व पुढे कुच करू लागले.

ब-याच छोट्या छोट्या टेकड्या पार केल्यावर ते सर्वजण एका पहाडापाशी आले.
सैनिकांनी विचारले “हाच आल्पस् पर्वत का?”
नेपोलिअन उत्तरला “नाही. नाही. आल्पस् तर यापेक्षा दीड पटीने उंच आहे. आल्पस् आला की मी सांगेनच तुम्हाला.”

सर्व पुन्हा पुढे निघाले. काही काळाने हा डोंगर उतरल्यावर एक मोकळे मैदान लागले. आपण उघडा माळ म्हणतो ना तसे.
किती तरी वेळ चालल्यावर सैनिकांनी त्याला विचारले “दूरवर काही पर्वत दिसत नाही. अजून किती लांब आहे आल्पस्?”

नेपोलिअन उत्तरला “कुठल्या आल्पस् ची गोष्ट करताय तुम्ही? आल्पस् आपण कधीच पार केला!”

२१ दिवसांचा लाॅक आउट, संचारबंदी आणि विदेशातून येणा-या बातम्या यामुळे मनातले “करोनाचे सावट” हे सर्व त्या “आल्पस्” पर्वतासारखे आहे. पण घाबरायचे काही कारण नाही. आपण सर्व सरकार वेळोवेळी देत असलेल्या सुचनांचे पालन करत राहुया. अशक्य काहीच नाही. आपण करोनावर कधी मात केली हे आपल्यालाच समजायचे नाही.
Let’s be together and fight out ... let’s follow the instructions seriously to implement social distancing.
Previous article
Next article

1 Comments

  1. Great thought human fight of life in many efforts this are the life struggles are never life are successful of human

    ReplyDelete

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel