भारतात बुध्द-मूर्ती बनविण्याची सुरुवात करणारे सम्राट कनिष्ठ आणि बौद्धमय भारताचा सुवर्ण इतिहास

*बुद्धमय भारताचा साक्षीदार महान राजा कनिष्क* अर्थात *बौध्दमय भारताचा सुवर्ण इतिहास*

क्षत्रप राजांनंतर कुशाण पुत्र विम- कफस काहींच्या मताने कडफीसीस ( 35-68 इसन) चीन मधील सिक्यांग प्रांतातील रहिवासी होता. कुएई- शुंआंग या समूहावरून कुशाण हे नाव पडले आहे. कुशाण कोणी व्यक्तीचे नाव नसून कुएई- शूआंग या समूहावरून पडलेले  नाव आहे. या समूहाच्या पाच टोळ्या होत्या
 एका पराक्रमी पुरुषाने या पाच टोळ्या जिंकून कुशाण राज्याची स्थापना केली. या पराक्रमी पुरुषाचे नाव होते कडफिसीस. याला कुशाण असेही म्हणतात. काबुल मध्ये या राजाचे पुष्कळ नाणी भेटली आहेत. 80 वर्षे राज्य केल्यानंतर या महान राजाचा  मूर्त्यु झाला..

  कुशाणचा वारसदार त्याचा मुलगा " विमकथफीस" राजा झाला. यानेच भारतावर  विजय संपादन केला. मथुरात या राजाचे अनेक नाणी भेटली आहेत. हा काल होता इसन 35-68 चा.मथुरात एक मूर्ती मिळाली आहे जिच्या खाली " महाराजो राजाधिराजो देव पुत्रो कुशाण पुत्र वेम" असे लिहिलेले आहे. कनिष्कच्या ऐतिहासिक पुराव्यासाठी  अनेक लेख व पुष्कळ नाणी आढळून आली आहेत.
  कुमारलात नावाच्या बौद्ध विद्वानाने " कल्पना मडीतीका" नावाचा ग्रंथ लिहिला आहे ज्याचे चिनी  भाषांतर आजही उपलब्ध आहे. या ग्रंथात कनिष्कने  भारतावर मिळविलेल्या विजयाचे वर्णन आहे. अन्य ग्रंथ " सिरी धम्मपिटक निदान सुत" यात म्हंटले आहे की कनिष्कने पाटलीपुत्र जिंकून आपल्या ताब्यात घेतले. तेथे प्रसिद्ध बौद्ध विद्वान अश्वघोष याना भेटले, आणि बुद्धांचे भिक्षापात्रा मिळवून त्यासाठी मोठा स्तूप बांधला.तिबेटीमधील अनुश्रुती या ग्रंथात कनिष्कच्या साकेत ( अयोध्या) विजयाचा उल्लेख केलेला आहे,

 ( सध्याच्या राममंदिरावर तोडगा काढण्यासाठी हा महत्वाचा पुरावा होऊ शकतो.) कनिष्कच्या विजयामुळेच सातवाहनांच्या हातातून पाटलीपुत्र गेले. कनिष्क ( इसन 78-106) हा बौद्ध राजा,  विमच्या पासुनच चीनमध्ये बुद्ध धम्माची मजबूत नीव टाकली गेली होती. याच्या नंतर या वंशात  "देवपुत्र कनिष्क " राजा होतो. तो उदार, प्रतापी, आणि धम्मावलंबी होता. भारतात बुद्ध मूर्ती बनविण्याची सुरवात कनिष्कच्या काळात झाली. जर कनिष्क नसता तर कदाचित आपल्याला आज ज्या बुद्ध मूर्ती दिसत आहेत त्या दिसल्याही नसत्या. सम्राट कनिष्कचा राज्य विस्तार अफगाणिस्तान, बेकटिरिया, काशगर, खोतान, आणि यारकंद पर्यन्त  झालेला होता. भारतात रावळपिंडी,पेशावर, बहालपूर, जेदा,मथुरा,श्रावस्ती, कौशम्बि, सारनाथ या नगरात या राजाचे नाणी आढळून आले आहेत. भिक्षू महाकवी अश्वघोष यांनी कनिष्कला धम्माचा उपदेश दिला होता. भिख्खू अश्वघोष वैशालीचे होते यांनीच कनिष्कला  चौथी धम्म संगती करण्याचा सल्ला दिला होता. या चौथ्या संगतीचा परिणाम असा झाला की बुद्ध धम्म चीन ,जपान ,कोरिया, तिबेट, आणि मध्य आशिया इत्यादी देशांत गतीने धम्म प्रसार झाला. कनिष्क सिकंदर सारखा महाम विजेता, चंद्रगुप्त मौर्या सारखा महान योद्धा आणि सम्राट अशोक सारखा महान धम्म प्रसारक होता. कनिष्कच्या दोन राजधान्या होत्या, एक ग्रीष्म ऋतूसाठी कपिशा (काबुल) आणि दुसरी हिवाळ्यासाठी पुरुषपूर ( पेशावर). या महान साम्राटाचे अनेक शिलालेख सापडले आहेत.           चौथ्या संगतीच्या निमित्ताने सम्राट अशोकाच्या पावलावर पाउल ठेवत कनिष्कने काश्मीरचे राज्य बौद्ध भिक्खू संघास दान दिले. राजधानी पुरुषपूर ( पेशावर) मध्ये कनिष्कस्तूप नावाचा 400फूट बाय 150 फूट बनविला, ज्यावर 25 सुवर्ण छत्र्या लावल्या होत्या. या छत्र्याची उंची 88 फूट होती.  कपिशामध्ये, राजविहार नावाने मोठा भव्य दिव्य विहार बांधला. याबरोबरच कनिष्कने कनिष्कपुर (काश्मीर) मध्ये मोठा बुद्ध विहार बांधला होता. या प्रतापी बौद्ध राजाचे धम्मासाठी खालील कार्य, नियम व आदेश होते.
१) धम्म भिख्खची मदत केली.
२) भगवान बुद्धाच्या पुष्कळ मुर्त्या बनविल्या
३) बौद्ध भिख्खूसाठी विहार बांधले.
४) चीन,कोरिया, नेपाळ इत्यादी देशात धम्म प्रसारक पाठविले.
५) कनिष्कपुरला ( काश्मीरला) धम्म सभा बोलवुन धम्म सिद्धांतावर आधारित एक धम्म ग्रंथ " महाविभाषा" लिहिला, यात ६ लाख ६०  हजार शब्दाच्या ३० हा हजार गाथा होत्या.
६) बुद्ध वाचनाना क्रम - बद्ध केले,
७) महाथेरो अश्वघोष, भिख्खू वसुमित्र, कवी मातृचेट आणि चरक वैद्य यांना राजाश्रय दिला.
८) महायान पंथाचा संस्थापक आणि संरक्षक झाला. यांनीच बुद्धांना देवता व अवतार मानून पूजा करण्याचा नियम बनविला. यांच्या काळातच पाली भाषा ऐवजी संस्कृत  भाषेचा वापर सुरू झाला. या सर्व कार्यमुळे कनिष्कला लोक दुसरा सम्राट अशोक संबोधू लागले.
९) बुद्धांचे भिक्षापात्र मगध वरून आणून पुरुषपूरला ( पेशावर ) 13 मजली उंच स्तूप बनवुन त्यामध्ये ठेवले.

चिनी प्रवाशांनी कुशाणकाळातील  काश्मीरचे वर्णन बौद्ध धम्माच्या प्रमुख केंद्रापैकी एक असून स्तुपांची नगरी होती असा उल्लेख केला आहे. जम्बुद्विपातील सर्वात उंच स्तुपांची ( 600 फूट उंच) पुरुषपूरला ( पेशावरला ) निर्मिती केली. या सम्राटाने मथुरा पासुन  बामियान पर्यन्त बुद्ध मुर्त्या स्तूप व विहारांची निर्मिती केली. असा हा महान बौद्ध राजा भारतातील सत्ताधाऱ्यामुळे  दुर्लक्षित राहिला. असा हा उज्ज्वल धम्म इतिहास. आपण या धम्म इतिहासाचा प्रचार व प्रसार केला तरच पुराणातील महाकाव्यातील भाकडकथा लोकांना सत्य वाटणार नाही, आपण बुद्ध धम्माचे पाईक असल्याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल. रस्ता भरकटलेले स्वगृही परत येतील, गरज आहे फक्त त्यांना धम्माचा सत्य आणि उज्वल इतिहास कथन करण्याची.
....संकलक दिनकर सोनकांबळे
धम्म प्रचार हेतू या इतिहासाचे हिंदी इंग्रजी भाषांतर करून प्रसार व प्रचार करावा माझ्या परवानगीची आवश्यकता नाही)
Previous article
Next article

1 Comments

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel