✍️ आपले लेख पाठवा
🆕 नवीन लेख

    ७ नोव्हेंबर विद्यार्थी दिन:- डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_आणि_त्यांचे_ग्रंथालय

    📚 # 🏛️डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तके वाचण्याची सवय #लहानपणापासूनच लागली होती. स्वतःची पुस्तके असावीत, म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची, एवढीच त्यावेळी माझी #महत्वाकांक्षा होती. त्या महत्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले, असे स्वतः बाबासाहेब म्हणतात.

         नवनवीन पुस्तके वाचावी असे बाबासाहेबांना वाटे. नवीन पुस्तके आणून देण्यासाठी ते आपल्या वडिलांकडे हट्ट धरीत. त्यांच्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी झाली की, बाबासाहेबांचे वडील पैशासाठी त्यांच्या दोन्ही वडील बहिणींकडे जात होते. धाकट्या बहिणीकडे पुस्तक घेण्यासाठी पैसे मिळाले नाही तर वडील त्यांच्या थोरल्या बहिणीकडे जात. तिच्या जवळही पैसे नसले तर तिच्याजवळून एखादा दागिना घेऊन मारवाड्याकडे जात व त्यांच्याकडून दागिना गहान ठेवून पैसे घेऊन पुस्तक आणून देत होते. सकाळी मागितलेले पुस्तक संध्याकाळपर्यंत त्यांना आणून दिलेले आहे. पुस्तक आणून दिले नाही असे कधीच झाले नाही.




         बाबासाहेबांचा वाचनाचा व्यासंग दिवसेंदिवस वाढतच होता. नवीन पुस्तके घेणे एक त्यांची सवय होऊन गेली होती. एकदा परदेशात गेले तेव्हा त्यांनी न्यूयॉर्कमध्ये जवळजवळ २००० पुस्तके खरेदी केली. जुन्या पुस्तकाच्या दुकानात जाऊन ही पुस्तके खरेदी केली आणि ती ३२ खोक्यातून भारतात पाठवून दिली. बाबासाहेब गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले. परिषदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी त्यांनी परिषदेशी संबंधित बाबींचा रात्रभर अभ्यासही केला. वेळात वेळ काढून जुन्या बाजारातून पुस्तके खरेदी केली व तीन पेट्या पुस्तके व्ही.एम.पवारांसोबत मुंबईस पाठवली. एक पेटी रा.ब. श्रीनिवास यांच्या सोबत दिली.


         नवीन पुस्तक बाजारात आले की, ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेच म्हणून समजावे. दिवसेंदिवस ही पुस्तके वाढत होती. ही #पुस्तके_जपून_ठेवावी, असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी मुंबईच्या दादर भागात घर बांधले. ते घर दोन मजली होते. ते या घरात १९३४ साली राहावयास गेले. दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर #पुस्तकांचे_ग्रंथालय होते. पुस्तके कपाटात होती. विविध विषयाची पुस्तके होती. एखादाही विषय सुटला असेल असे वाटत नाही. बसण्यासाठी फिरती खुर्ची होती. अर्धवर्तुळाकार सुंदर टेबल होता. खाली स्वयंपाकासाठी वापर होता.

         डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात लाॅर्ड जाॅन गंथर या लेखकाने १९३८ मध्ये 'इन्साईड आशिया' नावाचे पुस्तक प्रकाशित केले. त्यात ते लिहितात, संसार में सभी लोग अपने रहने के लिए मकान बनाते है किन्तु बाबासाहब ने किताबों की रक्षा के लिए मकान बनाया है। उस समय बाबासाहब के #राजगृह (मुंबई) के पुस्तकालय में ५०,००० किताबें थी। किताबे हर विषय पर थी। उन्होंने सोचा की संभवता सारी किताबें केवल अलमारी की शोभा बढ़ाती है। लेकीन उन्हें यह देख भारी #आश्चर्यमिश्रित_आनंद हुआ। उन्होंने लिखा की, ३५,००० किताबों मे कोई ऐसी किताब नहीं थी, जिसमें बाबासाहब के अध्ययन के निशान न हो।

          भारतातील विख्यात लोकांचे खाजगी ग्रंथसंग्रह वाखाणण्यासारखे होते. महाराष्ट्रातील पहिले आय.सी.एस. श्रीपाद बाबाजी ठाकूर, रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक, डाॅ.भांडारकरांचे थोरले चिरंजीव, न्या.के.टी. तेलंग, एम.आर.जयकर आणि पं.जवाहरलाल नेहरू ही नावे याबाबत विख्यात आहेत. परंतु याहीपेक्षा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे #ग्रंथसंग्रहालय नक्कीच मोठे आहे. एवढा मोठा ग्रंथसंग्रह #वैयक्तिक_स्वरूपाचा जगातही कोणाजवळ असेल असे वाटत नाही. हा प्रचंड ग्रंथसंग्रह पंडित मदनमोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी २ लाख रुपयास विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण डाॅ.बाबासाहेबांनी त्यांना नकार दिला. 



    बुक खरेदी कारण्यासाठी इथे क्लिक करा

         डाॅ.बाबासाहेबांना बरेच लोक #ग्रंथवेडे_आंबेडकर म्हणतात. ग्रंथालयात वाचावयास बसले म्हणजे त्यांना कशाचीही आठवण राहत नसे. पत्नी रमाबाई म्हणतात, 'खोलीचा दरवाजा आतून बंद करुन ते अभ्यासाच्या समाधीत गुंग झालेले असत.' जेवणाची वेळ झाली म्हणून रमाबाईंनी बाहेरून ओरडून दमावे, तरी पतीच्या अभ्यासाची समाधी उतरत नसे. कधीकधी ते न जेवता दिवसभर व रात्रभर याच समाधीत असत. रमाबाईंना त्यांच्याबरोबर उपास करावा लागे.

         डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथावर #अमाप_प्रेम होते. या प्रेमामुळेच आपल्या ग्रंथातयातील एकही ग्रंथ गहाळ होणार नाही याची नक्कीच काळजी घेत असत. ते आपल्या ग्रंथावर जिवापाड प्रेम करीत होते असे दिसून येते. दि.१२/१२/१९३८ ला मुंबईच्या विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन भाषण करताना म्हणाले की, "माझ्या घरावर सावकारीबद्दल जर जप्ती आली व बेलिफाने जर माझ्या पुस्तकाला हात लावला तर त्याला मी गोळी घालून जागच्या जागी ठार करीन." यावरून हे स्पष्ट होते की, ग्रंथाला ते #जीवाच्या_मोलाचे समजत.


    संकलन :-  सुरज तळवटकर

     संदर्भ  :- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर खंड १ - खैरमोडे 

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर - वसंत मून 

    युगपुरुष आंबेडकर - बी.अार.सांपला

    डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भाषणे खंड ४ - प्रा.गांजरे 

    Previous article
    Next article

    Leave Comments

    Post a Comment

    Iklan Atas Artikel

    Iklan Tengah Artikel 1

    Iklan Tengah Artikel 2

    Iklan Bawah Artikel

    WhatsApp
    ⇧
    🌐 भाषा: