बुद्धांची खरी शिकवण !
बुद्धं सरणं गच्छामि !
बुद्धधम्मातील सर्वांत पवित्र, सर्वांत महत्त्वाचे आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या त्रिशरण पंचशीलातील पहिले शरण म्हणजे 'बुद्धं सरणं गच्छामि !'* असे आहे.
याचा अर्थ असा आहे की, मी बुद्धाला शरण जातो.
म्हणजेच बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो.
दुसऱ्या अर्थाने असे म्हणता येईल की, मी बुद्धांची शिकवण अंगीकारतो मग बुद्धांची शिकवण काय आहे ?
तर बुद्धांची शिकवण म्हणजे
"सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान सासनं!"
*सब्ब* म्हणजे सर्व,
*पाप* म्हणजे अकुशल कर्म,
*अकरणं* म्हणजे न करणे,
* कुसलस्स* म्हणजे कुशल कर्म,
उपसम्पदा* म्हणजे संपादित करणे, जमा करणे, गोळा करणे.
*सचित्त परियोदपनं* म्हणजेच आपल्या चित्ताला शुद्ध ठेवणे.
"एतं बुद्धान सासन" हेच बुद्धांचे शासन आहे,
हीच बुद्धांची शिकवण आहे, असा त्याचा अर्थ होतो. यातील पहिली शिकवण आहे की, मी पापकर्म करणार नाही. तर पापकर्म कोणकोणते आहेत ?
तर * पापकर्म दहा प्रकारचे आहेत.
कायेने होणारी तीन पापकर्मे,
वाणीने होणारी चार पापकर्मे आणि
मनाने होणारी तीन पापकर्मे.
अशी एकूण दहा पापकर्मे मी करणार नाही.
कुशल कर्म करीन आणि चित्त शुद्ध ठेवीन.
कायेने म्हणजे या शरीराने कोणकोणती पाप कर्मे होतात?
तर हत्या करणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे ही कायेने होणारी पापे होत. वाणीने होणारी पापकर्मे म्हणजे कुणाची निंदा करणे, कुणाची चुगली करणे, कठोर बोलून कुणाचे मन दु:खी करणे, निरर्थक बडबड करणे आणि खोटे बोलणे हे वाणीचे चार प्रकारचे पाप होत. तर मनामध्ये लोभ, मोह आणि द्वेष असेल तर त्यामुळे पापकर्म घडतात. अशी दहा प्रकारची पाप कर्मे मी करणार नाही. माझे चित्त शुद्ध ठेवीन आणि कुशल कर्म करीत राहील. अशाप्रकारे जर आम्ही खऱ्या अर्थाने आचरण केले, तरच 'बुद्धं सरणं गच्छामि !' हे बरोबर आहे.

खुप छान..जयभिम
ReplyDelete