Zero Stage Theory
🧠 आज आपण बघणार आहोत — “Zero Stage Theory”
झिरो स्टेज ही अशी मानसिक अवस्था आहे, जिथे माणूस त्या टप्प्यावर येऊन पोहोचतो, जिथे तो सर्व प्रकारच्या आणि सर्व बाजूंनी विचार करणे थांबवतो. त्या अवस्थेत तो फक्त “बघ्याची” भूमिका घेतो.
या स्टेजवर तो आपल्या भूतकाळाकडे पाहतो, पण कोणताही पूर्वग्रह न ठेवता... फक्त निरीक्षण करतो.
भविष्याकडे पाहतो, जसे एखाद्या दूरवर दिसणाऱ्या माइलस्टोनकडे पाहावे — पण त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही.
तो फक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे शांतपणे पाहत राहतो.
लोकांची वागणूक, नाती, अनुभव, चांगल्या-वाईट घटना — यांचे तो आकलन करतो; पण त्यावर ना सकारात्मक प्रतिक्रिया देतो, ना नकारात्मक.
तो फक्त शांत राहतो... कारण त्याला हे उमगलेले असते की —
आज जे काही आहे, चांगले किंवा वाईट, ते कायमचे नाही.
हे सगळं नश्वर आहे... अनित्य आहे...
इथे कायम टिकणारे काहीच नाही.
✍️ लेखक — अमोल बोर्डे
📞 संपर्क — 9595497980
📍 छ. संभाजीनगर

Leave Comments
Post a Comment